Akkalkot: आता स्वामी भक्तांना तुळजाभवानीचा दर्शन सुध्दा अक्कलकोट मधूनच घेता येणार ; ‘न्यासा’कडून अन्नछत्र मंडळ परिसरात तुळजाभवानीच्या भव्यदिव्य मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना थाटात संपन्न

अक्कलकोट (प्रतिनिधी): आई राजा उदो..! सदा नंदीचा उदो..!! जय भवानी.. जय शिवाजीच्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात न्यासाच्या वतीने श्री तुळजाभवानी माता मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, कळसारोहन आणि मंदिर लोकार्पण सोहळा संभळाच्या गजरात विधिवत पूजनाने मिती श्रावण शु ||१५, नारळी पौर्णीमा शके १९४६, सोमवार रोजी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली थाटात संपन्न झाला.


दरम्यान होम, हवन, विधिवत पूजन सोलापूरचे वे.शा.स. कणसावी गुरुजीसह तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पिरोहित वे.शा.स. शाहू मगर, नागेश अंबुलगे, जयराम रणदिवे, श्रीराम अंबुलगे, मणुर येथील ब्रह्मवृंदानी व न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी यांच्या यथसांग विधिवत पौरोहित्य मंत्र पठणाने व वाद्यांच्या गजरात न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व विश्वस्त अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मातेचीमूर्तीची स्थापना करून, नैवेद्य व आरती करण्यात आली. याप्रसंगी जन्मेजयराजे भोसले यांनी सहपत्निक श्री तुळजाभवानी मातेची दर्शन घेतले.


दरम्यान विरक्त मठाचे श्री.म.नी.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात कळसारोहन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी गोंधळ, आरती, अन्नदान असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. श्री तुळजाभवानी मंदिराचे बांधकाम करणारे तेलंगणाचे राघवेंद्र व त्यांची टीमसह अन्य सहकार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहयोगी संस्था असलेली हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष अलकाताई भोसले, सचिवा अर्पिताराजे भोसले, अनुयाताई फुगे, तेजस्विनीराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, दर्शना लेंगडे-खोबरे, स्वाती निकम, संगीता भोसले, सरोजनी मोरे, मथुरा पाटील, क्रांती वाकडे, सपना माने, सुवर्णा घाटगे, रुप पवार, पल्लवी नवले, छाया पवार, दिपिका शिर्के, लक्ष्मी कणसाबे, पल्लवी कदम, उज्वला भोसले, स्मिता कदम, कोमल क्षीरसागर, सदिच्छा शिर्के व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संदीप फुगे-पाटील, मनोज निकम, संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, रामचंद्रराव घाटगे, विनोद खोबरे, राजु नवले, वैभव मोरे, रोहित खोबरे, सौरभ मोरे, अशोकराव जाधव, श्रीकांत झिपरे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, महेश शिर्के, रोहन शिर्के, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, स्वामिनाथ बाबर, सुमित कल्याणी, अतिष पवार, विशाल कलबुरगी, राहुल इंडे, अप्पा हंचाटे,प्रकाश लोंढे, संजय शिंदे, कुमार पाटील, गोविंद शिंदे, गोरख माळी, श्री चव्हाण, सिध्देश्वर जाधव, मैनुद्दीन कोरबू, भारत पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, गणेश भोसले, पिंटू साठे, किरण साठे, फहीम पिरजादे, रमेश हलसंगी, बलभीम पवार, संतोष माने, बाबुशा महिंद्रकर, बालाजी कटारे, रोहन लेंगडे, अमित सलबत्ते, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.