गावगाथा

माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

माजी विद्यार्थी मेळावा

माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबई प्रतिनिधी
किशोर गायकवाड

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

जोगेश्वरी पूर्व अरविंद गंडभीर हायस्कूलच्या १९८८-१९८९ च्या दहावी/जी च्या विद्यार्थ्यांनी जवळपास ३५ वर्षांनी एकत्र येत आरे कॉलनी येथील आदिवासी भागात असणाऱ्या वणीचा पाडा येथे स्नेह संमेलन साजरे केले शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शाळेतील क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते जोगेश्वरी पूर्व अरविंद गंडभीर हायस्कूलच्या १९८८-१९८९ च्या दहावी/जी च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे…
जोगेश्वरी पूर्व अरविंद गंडभीर हायस्कूल या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे

HTML img Tag Simply Easy Learning    

वर्गमैत्रीण हेमलता पाटील हिने चार वर्षांपूर्वी आपल्या दहावी जी वर्गाचा व्हॉटअप ग्रुप बनवला आणि आता ग्रुपमध्ये तब्बल ३२ जण जोडलेले गेलेले आहेत. दहावी झाल्यानंतर अनेक वर्ष एकमेकांपासून दुरावलेले शालेय जीवनातील मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटण्यास खूप उत्सुक होतेच वर्गातील सर्वांनी एकत्र येऊन एखादे स्नेहसंमेलन करावे ही सर्वांची इच्छा होतीच, पण वेळेअभावी आणि वेगवेगळ्या ठिकाणी रहायला व कामाला असल्याने सर्वांना एकत्र येण्यास वेळ मिळत नव्हता, पण काहीही झाले तरी एकत्र यायचे व पुन्हा एकदा आपल्या शाळेतील जीवनातील आठवणी जगवायच्याच असे मनोमन ठरवत सर्वांनी ३ मार्च २०२४ रविवारी एकत्र यायचे ठरवले…. खरतर आपण जिथे ज्या शाळेत शिकलो, लहानाचे मोठे झालो, आपले शिक्षक, अशा त्या आपल्या लाडक्या शाळेतच एकत्र येऊ या असे सुरवातीला सर्वांचे एकमत झाले पण शाळेत बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्याने तिथे जाण्याचे रहित करावे लागले. मग अशोक खांडवे, मंगेश गमरे किशोर सरवणकर, नितीन विचारे, किशोर गायकवाड, संगीता साटम,आणि इतर सर्वांच्या सहकार्याने गोरेगाव आरे कॉलनीच्या वणीचापाडा येथे निसर्गाच्या सानिध्यात स्नेहसंमेलन करू या असे सर्वांनी ठरविले. आणि तो प्रत्यक्ष दिवस ३ मार्च रोजी उजाडला आणि सर्वजण एकमेकांना भेटले. येत खूप धम्माल केली. अशोक खांडवेने या ठिकाणी फार सुंदर व्यवस्था केली होती. आजच्या दिवशी प्रत्येकाने शाळेतील आठवणी, गमती जमती सांगत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.पुन्हा एकदा नव्याने शाळेचा वर्ग यावेळी भरला होता. अनेक विद्यार्थी MUMBAI च्या बाहेर असून ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते . वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता..
आज अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कामाला आहेत. गंमत म्हणजे आज अभ्यासाचे टेन्शन नव्हते..

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मंगेश गमरे, जयवंत बोलाईकर, अशोक खांडवे,यांनी घेतली होती. अशोक खांडवेने याने प्रस्तावना मांडली तर संगीता साटम हिने स्वहस्ते बनविलेला शाळेच्या नावाचा केक सर्वांनी एकत्र येत कापला. नंतर रवींद्र चव्हाण, स्मिता तलावडेकर, सुषमा चिखले, राजेश गोसावी, विनायक वणे , वंदना खानविलकर, समीर उले, संतोष मसूरकर, दीपक वाघ, नितीन विचारे, वैजयंती शिर्के, सुनील बागल,अलका साळवे,किशोर गायकवाड, अर्चना कोडक,दर्शना पाटोळे,यांनी आपल्या शालेय जीवनातील व्यथा, गमंती जमती सांगितल्या. त्यानंतर नाच गाणी, मजा मस्ती, विनोद करीत सर्वजण पुन्हा एकदा लहान झाले.ज्या वर्ग मित्र मैत्रीणीना आज काही कारणास्तव यायला जमले नाही ते सर्व जण एका छान कार्यक्रमा दरम्यान वंचित राहिले असेच म्हणावे लागेल. निघताना सर्वांनी एकमेकांना पुन्हा वरचेवर भेटत राहू या हा विश्वास देऊन १९८८-८९ साली शाळेत दहावीच्या असणाऱ्या A ते एच वर्गाचे एकत्र स्नेह संमेलन करता येईल का यावर विचार विनिमय केला.व शाळेतील सर्व शिक्षकवर्गाचे आभार मानले त्याच्यामुळे आज आम्ही इथवर पोचलो,कार्यक्रमाच्या शेवटी किशोर गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानून स्नेहसंमेलनपुरतेच एकत्र न येता प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण एकत्र येऊ असे मत मांडले त्याला सर्वांनी दुजोरा दिला व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपला
किशोर गायकवाड
9833242899

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button