गावगाथा

वाढत्या उन्हातही स्वामी समर्थ दर्शनासाठी गर्दी : अन्नक्षेत्र मंडळाच्या वतीने उत्कृष्ट नियोजन व सोयी सुविधा मिळत असल्याने स्वामी भक्तांमध्ये समाधान..

शहरात ठिकठिकाणी नियोजन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी करण्यात येत आहे

वाढत्या उन्हातही स्वामी समर्थ दर्शनासाठी गर्दी : अन्नक्षेत्र मंडळाच्या वतीने उत्कृष्ट नियोजन व सोयी सुविधा मिळत असल्याने स्वामी भक्तांमध्ये समाधान..

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*अक्कलकोट तालुक्यात मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता दिवसंदिवस वाढत चालली आहे. आशा परिस्थितीत सुद्धा श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी स्वामी महाराज दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्यामुळे सर्व ठिकाणचे लॉजेस हाऊसफुल्ल झाले आहेत. श्री स्वामी समर्थ अननछत्र मंडळ हे व्यवस्थापनात अववल ठरत असून, उन्हाळ्याची तीव्रता पाहता मंडळाकडून भाविकांकरिता विविध उपाययोजना आखण्यात आलयाने भकतांतून समाधान व्यक्त होत आहे.*

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून एकीकडे तीव्र पाणी टंचाई दुसरी कडे उन्हाची तीव्रता रोज वाढत चालली आहे. आशा परिस्थितीत सुद्धा अक्कलकोट येथे देश विदेशातून रोज लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. लांबच्या लांब दर्शन रांगा लागत आहेत. यामुळे वटवृक्ष मंदिरातील नित्यनियमाने चालणारे अनेक धार्मिक कार्यक्रमात बदल करावे लागत आहे.

भक्त निवास, यात्री निवास, शिवपुरी,एवन चौक येथील राजेराय मठ, राम गल्लीतील गुरू मंदिर, एकमुखी दत्त मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मंदिर, याही ठिकाणी सुद्धा भाविकांनी मनोभावे दर्शन घेत आहेत.आणि मिळेल तिथे रूम बुक्क करून मुक्कामी राहत आहेत. सर्वत्र प्रसादाचे दुकानात खरेदीसाठी एकच गर्दी होत आहे.

:विविध धार्मिक संस्थेचे मिळून तब्बल १ हजारहून अधिक रूम आहेत. ते सर्व हाऊसफुल्ल झाले असून खासगी एक हजार रूम असे सर्व ठिकाणी मागील आठ दिवसापासून बुक्कीग होत आहेत. एकंदरीत पार्किंग व्यवस्था ढासळली आहे. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पोलिसांचे दमछाक होत आहे. परिणामी सर्वत्र ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे. याचा फटका भाविकांना बसत आहे. सर्वांत मोठी अडचण पार्किंग व्यवस्थाची होत आहे.

वाढत चालली उन्हाची तीव्रता पाहता मंदिर परिसरात जून पर्यंत मंडप, जागोजागी पिण्यासाठी थंड पाणी, जेष्ठांना दर्शन रांगेत बसण्यासाठी बाकडे, आशा विविध प्रकारचे सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. अशीच गर्दी गाणगापूर येथे सुद्धा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button