Wagdari : वरात निघाली बैलगाडीतून…. जुन्या काळातील आठवणींना उजाळा ; चक्क बैलगाडीतून वरात पारंपरिक आधुनिक डिजेचा सांगड

वागदरी (प्रतिनिधी ): आधुनिक काळात विवाह म्हणजे एकप्रकारे श्रीमंतीचे शक्तिप्रदर्शन होत आहे.लग्नाचा मोठा बडेजाव केला जातो.आलिशान वाहनातून वरात काढण्याचे प्रकार नवीन नाही. मात्र अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील एका स्मार्ट युगातील सुरेश बंगरगी तरुणाने जुन्या पारंपरिक बाज जपत चक्क बैलगाडीतून वरात वाजत काढली. सोबत डिजेचा आवाजाने तरुणांनी ठेका धरला.

अनेक ठिकाणी विवाह सोहळा विमान, हेलिकॉप्टर, जहाज, पर्वत अशा अनेक ठिकाणी पार पाडून श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाते. पण, वागदरी येथील विवाह जुन्या काळातील आठवण देऊन गेला.२० वर्षांपूर्वी लग्नाची वरात बैलबंडीतून काढली जायची. आता आधुनिक युगात ही प्रथा बंद पडलेली आहे. मात्र वागदरी येथील सुरेश बंगरगी यांची वरात बैलगाडीतून काढण्यात आली.

२० वर्षांपूर्वी लग्न सोहळ्याची वरात अशा पद्धतीने काढली जात होती. त्या आठवणी ताज्या झाल्या. बैलगाडी व बैल जोडीला रंगरंगोटी करून आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेली होती. बैलांनासुद्धा साज चढविण्यात आला होता. बैलगाडी हाकलणारा व्यक्ती सारथीच्या रूपात विराजमान होता. त्याच्या मागे नवरदेव नवरी राजा राणी सारखे दिसत होते संपूर्ण वरात डिजेच्या गजरात गावाच्या मुख्य रस्त्यावरून भ्रमण करत आनंद व्यक्त करीत होती.
