Akkalkot Swami Samarth: आध्यात्माच्या उन्नतीकरीता भजन सेवेसारखे उपक्रम मोलाचे – महेश इंगळे

अक्कलकोट (प्रतिनिधी): सद्गुरू श्री स्वामी समर्थ नामाचा प्रचार आणि प्रसार या कार्याअंतर्गत जप, नामस्मरण, किर्तन भजन, गायन या सेवा म्हणजे अध्यात्मिक उन्नती सोबत स्वामी सेवकांसाठी भक्ती प्रेमाचे हक्काचे व्यासपीठ हे ध्येय समोर ठेवून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भजनी मंडळाकडून भजन सेवेच्या मागणीनुसार भजन सेवेचे आयोजन करण्यात येत असते. या भजन सेवेत स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवातील भजनी मंडळांसह वर्षभरात ही राज्यातील विविध भजनी मंडळाकडून भजन सेवा स्वामी चरणी समर्पित होत असतात. या अनुषंगाने आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतिबा मंडपात मुंबईच्या श्री स्वामी समर्थ जय शंकर भक्त परिवारची भजन सेवा संपन्न झाला.

श्री स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित झाली. आजच्या भजनी मंडळाच्या भजन सेवेसह सालाभरात मंदिरात भजनी मंडळाच्या वतीने स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित होणाऱ्या भजन सेवांच्या माध्यमातून आध्यात्माच्या उन्नतीकरीता भजन सेवेसारखे उपक्रम मोलाचे असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुंबईच्या श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचे कलाकार मंदार सावंत, अनिल कोळवणकर, दिनेश साळवी, पांडुरंग आमले, शिवाजी निकम, शिल्पा साळवी, प्राची चिले, सुनिता सरवडे यांचा महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.

याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाच्या वतीने आज संपन्न झालेल्या या भजन सेवेत भजनी मंडळाच्या कलाकारांनी स्वामींचा गजर, यावे गजा वदन यावे, तारी तारी स्वामी राया, अक्कलकोटचे स्वामी वंदितो तुमचा मी, शंकर बाबा हात जोडतो, तुमही देव आदींसह विविध भाव भक्ती गीते गाऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत स्वामी सेवेचे ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमास भक्त श्रोत्यांनीही मोठी गर्दी केली होती.
