सामाजिक शास्त्रे व्यक्तीला आत्मभान देण्याचे कार्य करतात डॉ. गौतम कांबळे
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिषदेचे समन्वयक डॉ. किशोर थोरे, डॉ. अंकुश शिंदे, डॉ. गणपतराव कलशेट्टी, प्रा. संध्या इंगळे, प्रा. विकास भारतीय व शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.

व्यक्ती समाजात राहत असल्याने व्यक्ती समोरील निर्माण झालेल्या सामाजिक समस्यांचा अभ्यास सामाजिक शास्त्रातून केला जातो. सामाजिक शास्त्रे मानवी वर्तनाचा अभ्यास करतात त्याच बरोबरच समाजाच्या विविध व्यवस्था, त्यांनी निर्माण केलेल्या संस्था, त्यांचा इतिहास, बदलती मानसिकता व जीवनमुल्ये, याचा हि अभ्यास केला जातो. सामाजिक शास्त्रे व्यक्तीला आत्मभान देण्याचे कार्य करतात, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर
विद्यापीठाचे स्कूल ऑफ सोशल सायन्सेस चे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले.


अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय सामाजिक शास्त्र विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी संचालक डॉ. गौतम कांबळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदचे सदस्य देवानंद चिलवंत, प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट, वालचंद महाविद्यालयातील
डॉ. गोविंद तोडकरी,
मुख्य समन्वयक
प्रा. विलास अंधारे उपस्थित होते.

संचालक डॉ. गौतम कांबळे पुढे म्हणाले,
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सामाजिक शास्त्राची उपयुक्तता काल सुसंगत असणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्येकाने आत्मसात करावे. आपण सर्वजण या धोरणाचा पुरस्कार करून बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करावे. सामाजिक शास्त्र विद्यार्थी परिषदेच्या अभ्यासाचा विषय हा व्यक्ती असल्याने व्यक्तीच्या विविध वर्तनाचा अभ्यास सामाजिक शास्त्रे करतात. खुली आणि वेगाने बदलणारी अर्थव्यवस्था, मानवी जीवनावरील विज्ञान तंत्रज्ञान यांचा वाढता प्रभाव यामुळे मानवी जीवन मुल्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
समाज अस्वस्थ होत चालला आहे. अशा वेळी व्यक्तीचे मानसिक, शारीरिक अस्वस्थता सोडविण्याचे कार्य सामाजिक शास्त्राना करावी लागतात. व्यक्ती समोरील नवनवीन प्रश्न सोडवण्याचे आव्हान सामाजिक शास्त्रासमोर आहेत. सामाजिक शास्त्र अभ्यासकांनी गांभीर्याने चिंतन आणि संशोधन करण्याचे गरज असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट म्हणाले कि, सामाजिक शास्त्रे समाजाच्या बदलाचा अभ्यास करतात. समाजाची गरज लक्षात घेऊन सामाजिक मुल्यांची जपवणूक करतात. त्यामुळे शिक्षण पद्धतीत सामाजिक शास्त्राचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगितले.

या परिषदेत राज्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे शंभर हून अधिक प्राध्यापक व विद्यार्थी – विद्यार्थ्यिनी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. भैरप्पा कोणदे यांनी सामाजिक शाश्त्राचा उद्देश सांगून महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख अतिथींचा परिचय
प्रा. विलास अंधारे यांनी करून दिला. डॉ. लता हिंडोळे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.
अप्पासाहेब देशमुख यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिषदेचे समन्वयक डॉ. किशोर थोरे, डॉ. अंकुश शिंदे, डॉ. गणपतराव कलशेट्टी, प्रा. संध्या इंगळे, प्रा. विकास भारतीय व शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.