कानडी सीमावर्ती भागात घुमला मराठीचा जयघोष.प्रचंडे हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा.
मराठी राज्यभाषा दिंन विशेष

कानडी सीमावर्ती भागात घुमला मराठीचा जयघोष.प्रचंडे हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा.

अक्कलकोट दि,२६_नागणसूर ता.अक्कलकोट येथील एच.जी. प्रचंडे हायस्कूल या सीमावर्ती भागातील शाळांमध्ये आज मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठीचा जयघोष घुमला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शंकर व्हनमाने हे होते.
विश्वगुरू महात्मा बसवेश्वर साहित्य परिषद,महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी २०१३ पासून कानडी सीमावर्ती भागात व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी हा मराठीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरे करतात यंदाचे हे अकरावे वर्ष आहे.
अमृतालाही पैजेत जिंकणाऱ्या मराठी भाषेच्या गौरवाचा आजचा दिवस असल्याने,रुजवू मराठी,फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी असे आवाहन अक्कलकोट तालुक्यातील कानडी भाषेच्या मुलांना हरवाळकर यांनी केली.या भागातील मुलांची बोलीभाषा कानडी असल्याने.त्यांना मराठी बाबत व्याकरण दृष्ट्या अडचणी येतात.त्याला न घाबरता आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेक मुलांना मराठीतून अभंग, ओव्या बोलण्यास प्रवृत्त केले.
यावेळी उत्कृष्ट ग्रंथ वाचन स्पर्धेतील मुलांना पुरस्कार वितरित करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक प्रशांत नागुरे,शरणप्पा मनुरे,अनिल इंगळे, प्रमिला शिवगुंडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विश्वनाथ वाघमोडे यांनी केले तर आभार भीमाशंकर सोलापूरे यांनी मानले.यावेळी संजयकुमार गंगदे,बेबी प्रचंडे,थावरू चव्हाण यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..
