उच्च ध्येयासक्ती बरोबरच उत्तम संस्कार महत्त्वाचे –श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी. ——
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.

, उच्च ध्येयासक्ती बरोबरच उत्तम संस्कार महत्त्वाचे –श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी. ————————————-

दि. २७ जानेवारी रोजी महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.प्रारंभी विद्यादेवी सरस्वती व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मा. श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी सर व संस्थेच्या समन्वयिका सौ. पुनम कोकळगी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर दहावीच्या विद्यार्थिनी कु. सानिका मंगरुळे,कु.प्रज्ञा घोडके,कु.वाघेश्वरी काळजाते, तर विद्यार्थी ओंकार कावळे, सुधीर पांढरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी संस्थेच्या समन्वयिका सौ. पुनम कोकळगी मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी संभ्रमावस्थेत न राहता उच्च ध्येयासक्ती बाळगली पाहिजे व त्यासोबतच आपल्यावर केल्या गेलेल्या उत्तम संस्काराचे जतन करा, अनावश्यक गोष्टीत वेळ खर्ची न घालता प्रयत्नशील रहा,आपल्यासाठी आयुष्य वेचलेल्या आई- वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा, त्यांची सेवा करायला विसरु नका असा आशावाद आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री. विलास बिराजदार, पर्यवेक्षक श्री. अशोक साखरे, वर्गशिक्षक श्री.ज्ञानदेव शिंदे, जेष्ठ शिक्षक श्री. विश्वनाथ चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अप्पासाहेब काळे,श्री. धनंजय जोजन, श्री.शशीकांत अंकलगे, जेष्ठ शिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी, सौ. स्वप्नाली जमदाडे,सौ.मल्लम्मा चप्पळगाव, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. राणी तेली हिने केली तर सुत्रसंचालन कु. अंजली रोट्टे हिने केले व आभार कु. अदिती व्हनमाने नी मानले.
