वागदरी येथे स्वा.सावरकर वाचनालयात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ अभिवादन …
दिन विशेष
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241206-WA0027-780x470.jpg)
वागदरी येथे स्वा.सावरकर वाचनालयात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ अभिवादन …
वागदरी — येथील स्वातंत्र्यवीर सावरकर
वाचनालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ अभिवादन करण्यात आले यावेळी एस.एस.शेळके प्रशालेचे चेअरमन मल्लिनाथ शेळके मा.मल्लिनाथ बंदीछोडे, प्राचार्य सुधीर सोनकवडे ,संगमेश कलशेट्टी ,सागर ठोंबरे, आप्पासाहेब दनुरे ,कोटप्पा कोठे, श्रीकांत सोनकवडे, चनबसप्पा चितली, मुन्ना कलशेट्टी ,सुरेश छुरे, इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य सुधीर सोनकवडे यावेळी म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जातिव्यवस्थेतील दलित समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केले.अस्पृश्यतेची प्रथा संपविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून,भगवान गौतम बुद्धांची शिकवण तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांनी मागास समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.दरवर्षी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी देशासह जगभरातील अनुयायी चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दाखल होतात
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)