गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अक्कलकोट शहरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट:-(तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे निवड झाल्याबद्दल अक्कलकोट शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने अक्कलकोट शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांचे आतीशबाजी करत जल्लोष करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

 महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे निवडणूक होऊनही गेल्या बारा दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार या कडे राज्याची लक्ष लागले होते. अखेर गुरुवार पाच डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व विविध राज्यातून आलेले विद्यमान मुख्यमंत्री, संत महंत व भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला आणि अक्कलकोट शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांचे आतिषबाजी करत भारतीय जनता पक्षाचा विजय, असो देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! आमदार सचिन कल्याणशेट्टी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! भारत माता की जय व वंदे मातरम असे विविध घोषणा देत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

याबरोबरच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील अक्कलकोट मैंदर्गी,दुधनी, जेऊर, तडवळ, नागणसूर, तोळणुर, सलगर, वागदरी,चपळगाव, हन्नूर,दहिटणे, वळसंग,कुंभारी, बोरामणी,मुस्ती, तांदुळवाडी आधी भागात भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

HTML img Tag Simply Easy Learning    

 याप्रसंगी शिवशंकर वाले, यशवंततात्या धोंगडे, महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, रमेश कापसे, अंबण्णा चौगुले, शिवशंकर चनशेट्टी, बबलु कामनुरकर,आनंद खजूरगिकर सर ,आनंद पवार , विनोद मदने, नावेद डांगे, सिद्दू चौगुले, सुनिल गवंडी, वैजनाथ मुकडे, उदय नरेगल, स्वप्नील फुकाळे,अभि लोकापुरे, चंद्रकांत दसले,शरणु कापसे ,अतिष पवार,देविदास गवंडी सिध्दाराम माळी, बबलु भागानगरे,हुसेन बागवान,रवि साठे, नितिन जामदार,अमित कोळी, विजय लाडगे,भारत भाडेकर,नुर शेख, शेखर वाले, निशात निबाळकर , राजू कोतवाल,सचिन शिदे , गोविंद शिंदे, चेतन शिदे ,महादेव कामनुरकर, अक्षय तारापुरे,जगदिश बिराजदार, लाला राठोड,रूद्रु स्वामी, संजय जमादार, धनजय गाडवे,नितुराज बडगर, सूर्यकांत बाचके , राजाराम पवार,निखिल शिदे शिवराज तडवळ,दिनेश शेडम,शिखदर चाऊस,वैजुनाथ मुकडे,नागराज, कलबुर्गी,अनमोल सुरवसे, गर्जेंद्र कोळी सागर शिंदे, प्रमोद कलशेट्टी,चंदन पाटील, गितकुमार पवार, अभिजीत चव्हाण,विरेश कळ्ळीमठ,बसवराज स्वामी, शिवराज तडवळ,सिध्दु माशेट्टी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button