Mangalvedha : मंगळवेढा आगारास सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे यांची सदिच्छा भेट


सोलापूर (प्रतिनिधी): रोजी राज्य परिवहन मंगळवेढा आगारात सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.

या भेटीवेळी आगारातील कर्मचाऱ्यांनी प्रणिती शिंदे यांच्याकडे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तसेच रा.प.महामंडळास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाकडून नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. आगार व्यवस्थापक संजय भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


यावेळी स्थानक प्रमुख शरद वाघमारे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विठ्ठल भोसले, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी,वाहतूक नियंत्रक संतोष चव्हाण, दत्तात्रय रायबान, गणेश गवळी,वरिष्ठ लिपिक अमोल काळे, धनाजी पाटील, सचिन माने तसेच वाहक ब्रह्मानंद ठाकूर, अनिल बेदरे, सलाउद्दीन काझी तसेच महिला वाहक सविता काटकर, सविता सुरवसे व बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.