लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा अक्कलकोट यांच्या वतीने 10 वी 12 वी गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार……
सत्कार सन्मान

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा अक्कलकोट यांच्या वतीने 10 वी 12 वी गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार……

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,सोलापूर शाखा – अक्कलकोट येथे इयत्ता १० वी-१२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास आपल्या शाखेचे सर्व सल्लागार तसेच खातेदार सल्लागार व खातेदार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. .*
*गुणवंत विद्यार्थी :-*
1.साळुंखे ऋषिकेश मिलिंद :- 89%
2. कदम नम्रता नारायण :- 90%
3. आळंद सुरजकुमार अभिनव :- 92%
4. चव्हाण भारती चंद्रकांत :- 90%
5. गोंडाळ प्रज्वल निरंजन :- 92.40%
6. सोमवंशी लक्ष्मी प्रसाद : 90%
7. धरणे चेतन विजय : 74%
8. जैन पायल समीरचंद : 70%
यां कार्यक्रम प्रसंगी पसारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा विषयी योग्य मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाखेचे सल्लागार शहा सर, वाले सर, चिकमळ सर, पसारे मॅडम, भागानगरे मॅडम, इतर सल्लागार,खातेदार तसेच पतसंस्थेचे शाखाधिकारी कु. लोकापुरे मॅडम, सौ. कदम मॅडम व सर्व कर्मचारी उपस्तिथीत होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. रेखा बिराजदार यांनी केला तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सांगता श्री. नागराज घुगरे यांनी केला.
