Mumbai: सुलेखनकार, रत्नकांत विचारे यांना राष्ट्रस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार प्रदान

मुंबई (प्रतिनिधी): सुलेखनकार रत्नकांत अनंतराव विचारे, गांधी बालमंदिर हायस्कूल कुर्ला यांना, त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानासाठी, ग्लोबल गोल्ड टॅले टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड नवी मुंबई यांच्यातर्फे 2024 25 चा राष्ट्रस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले “महाराष्ट्र रत्न” हा सन्मानाचा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते व विनोद वीर सन्माननीय श्री. जॉनी रावत यांच्यातर्फे देऊन गौरवण्यात आले आहे.

सुलेखनकार रत्नकांत अनंतराव विचारे हे गेली 32 वर्ष गांधी बाल मंदिर कुर्ला, या शाळेत कार्यरत असून त्यांनी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात भाग घेऊन अनेक पुरस्कार मिळविलेले आहेत.

1) सतत दहा वर्ष आई-वडील नसलेल्या अनाथ आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांची शालेय वार्षिक हजार रुपये फी लोकवर्गणीतून जमा करून भरणे .(यावर्षी 76 हजार रुपये भरले)

2) सतत नऊ वर्ष कॅन्सर पीडित लोकांसाठी एनडीएस संस्थेमार्फत सेमिनार मध्ये समुपदेशन करणे. शक्य असल्यास घरी जाऊन कर्करोग ग्रस्त रुग्णांना डायट समजावणे. अशी कामे केली आहेत. (ऑनलाइन भारतासह इंग्लंड अमेरिका व कॅनडा या देशातही )

3) विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षरासाठी सुलेखन वर्ग घेणे. शुद्धलेखन वर्ग घेणे. चित्रकलेसाठी विद्यार्थी उपक्रम राबवणे. दरवर्षी एलिमेंट्री इंटरमिजिएट चा मोफत क्लास घेऊन शंभर टक्के रिझल्ट लावणे.
4) जनजागृती समिती पुस्तकांची मुखपृष्ठे बनविणे.
5) सुंदर शालेय फलक लेखन करणे. अशा अनेक शैक्षणिक व सामाजिक उल्लेखनीय कामाच्या सन्मानार्थ त्यांना २०२४..२५ चा महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
शाळेतही अनेक उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. स्वच्छ नदी अभियान, संविधान दिन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, करुणा काळातील शैक्षणिक साहित्य वाटप, किराणा वाटप, लसीकरण मोहीम, चित्रकलेसाठीही ग्रीटिंग कार्ड व कंदील बनवणे उपक्रम अशा अनेक उपक्रमातुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा ते प्रयत्न करतात. या पुरस्काराबाबत समाजाच्या सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षक व मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी या पुरस्काराबाबत रत्नकांत विचारे सरांचे अभिनंदन केले आहे.