गावगाथा

औषध निर्मितीच्या क्षेत्रात फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संशोधन करावे….. शरण पाटील

येथील माधवराव पाटील फार्मसी महाविद्यालयाच्या सभागृह फार्मसी कॉलेजच्या वतीने प्रथम वर्ष स्वागत प्रसंगी शरण पाटील बोलताना मान्यवर व अन्य.

औषध निर्मितीच्या क्षेत्रात फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संशोधन करावे….. शरण पाटील

मुरूम, ता. उमरगा, ता. १४ (प्रतिनिधी) : व्यवसायिक अभ्यासक्रम व तंत्र कौशल्ये हे आधुनिक जगात रोजगार आणि करिअर विकासाची महत्वाची अंगे आहेत. प्रामुख्याने व्यावसायिक कौशल्य, औद्योगिक ज्ञान आणि तांत्रिक क्षमता आजच्या तरुणांमध्ये असणे गरजेचे आहे. तांत्रिक अभ्यासक्रम, माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर विकास, यंत्र अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रम, व्यवसाय व्यवस्थापन याकडे विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून पाहिले पाहिजे. आज आरोग्य क्षेत्रामध्ये औषध निर्मितीच्या कार्यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संशोधन करुन औषध निर्मितीमध्ये तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी केले. नगर शिक्षण विकास मंडळ संचलित माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सत्काराप्रसंगी शनिवारी ( ता. १४) रोजी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर होते. यावेळी नाट्य कलावंत संजय कोथळीकर, विज्ञान शिक्षक विजय दिंडोरे, माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, फार्मसी कॉलेजचे समन्वय प्रा. डॉ. रवींद्र आळंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नाट्य कलावंत संजय कोथळीकर, प्राचार्य श्रीराम पेठकर, विजय दिंडोरे यांना मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. सदाफलमास मुजावर, प्रा. अनिल मोरे, प्रा. राहुल इंजे, प्रा. सुदिप ढंगे, अमोल कटके, किशोर कारभारी आदींनी पुढाकार घेतला. नबीलाल जमादार, प्रतीक राठोड, सुरज साठे, दिनेश गडवे, सलोनी वाघे, श्रीया मुरूमकर, आकांक्षा इंगळे, सुप्रिया बावा आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पायल अंबर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनीत बागडे व प्रा. सरोजा कालजाते तर आभार प्रा. विवेकानंद चौधरी यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व कर्मचारी वृद्ध उपस्थित होते. O याप्रसंगी संजय कोथळीकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करिअर सोबतच अन्य कला-कौशल्य आत्मसात करुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी. याकरिता स्वतःमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास करण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील फार्मसी महाविद्यालयाच्या सभागृह फार्मसी कॉलेजच्या वतीने प्रथम वर्ष स्वागत प्रसंगी शरण पाटील बोलताना मान्यवर व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button