डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचा राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार अंतर्गत महाराष्ट्राला सहा पुरस्कार

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार अंतर्गत महाराष्ट्राला सहा पुरस्कार

पंचायतीचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या पंचायत राज विभाग वतीने नवरत्न संकल्पनेचा अवलंब केला आहे . नवरत्न संकल्पना प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी गतवर्षीपासून पंचायत राज संस्थासाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सुरू केले आहे.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 3 ग्रामपंचायत, 1 पंचायत समिती व 1 पंचायत क्षमता निर्माण संस्था यांना आज नवीदिल्ली येथे भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त संस्था खालीलप्रमाणे
(1) पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार- यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा पुणे
(2) नानाजी देशमुख सर्वोत्तम सतत विकास पुरस्कार -सर्व श्रेष्ठ ग्रामपंचायत- देशात प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत मान्याचीवाडी ता.पाटण जि.सातारा
(3) नानाजी देशमुख सर्वोत्तम सतत विकास पुरस्कार -सर्व श्रेष्ठ पंचायत समिती देशात तृतीय क्रमांक- ब्लाॅक तिरोरा जिल्हा गोंदिया
(4) ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार- देशात प्रथम क्रमांक –
ग्रामपंचायत मान्याचीवाडी ता.पाटण जि.सातारा
(5) कार्बन न्यूट्रल पंचायत विशेष पुरस्कार- देशात प्रथम क्रमांक-
ग्रामपंचायत बेला ता. भंडारा जि. भंडारा
(6) दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार अंतर्गत स्वच्छ व हरित गाव या थिम मध्ये देशात तृतीय क्रमांक-
ग्रामपंचायत मोडाळे ता. इगतपुरी जि. नाशिक

वरील सर्व ग्रामपंचायत,पंचायत समिती व संस्थांना मा.राजीव रंजन सिंह पंचायती राज मंत्री भारत सरकार,मा.एस.पी.सिंह बघेल राज्य मंत्री पंचायत राज विभाग भारत सरकार यांचे प्रमुख उपस्थितीत नवीदिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
यशदा राज्य ग्रामीण विकास संस्था यास SDGs, PDI, Capacity Building of PRI Members and functionaties ..मध्ये पंचायत विकास पुरस्कार कार्यक्रमात पुरस्कार Dr Mallinath Kalshetti DDG and Director SIRD Yashada Pune यांनी स्विकार केला
