स्नेहालय संचलित’ रेडिओ नगर ९०.४’ दिवाळी अंक स्पर्धेत ‘विनर्स’ प्रथम
अहिल्यानगर –
स्नेहालय रेडिओ नगर ९०.४ एफएम आयोजित उत्कृष्ट दिवाळी अंकांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘विनर्स’ने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक ‘तेजोमय’ला, तर तिसरा क्रमांक ‘कालनिर्णय’ला मिळाला. ‘गावगाथा आणि ‘द इनसाईट’ या दिवाळी अंकांची उत्तेजनार्थ म्हणून, तर विशेष पारितोषिकासाठी ‘जागर’ हा हस्तलिखीत दिवाळी अंक आणि ‘आनंदघन’ची निवड झाली.
प्रथम क्रमांक ३००० , द्वितीय क्रमांक २००० आणि तृतीय क्रमांक १००० रुपये, तसेच गौरवचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असं बक्षिसाचं स्वरूप आहे. सहभागी सर्व दिवाळी अंकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे परीक्षण पल्लवी गुजराथी आणि अंजली देशमुख यांनी केले.
‘विनर्स हा जगातील पहिला ‘एआय’ लिखित दिवाळी अंक असून त्याचे संपादक विनोद शिंदे व सुनील निकम (पुणे) आहेत. ‘तेजोमय’ दिवाळी अंक पुणे डाॅक्टर्स असोसिएशनतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. ‘कालनिर्णय’ अंकाचे संपादन जयराज साळगावकर (मुंबई) यांनी केले आहे.
पारितोषिक वितरणाची तारिख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती स्टेशन हेड संदीप क्षीरसागर यांनी दिली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!