
रामलिंगेश्वर प्रशाला शिक्षण संकुलन तीर्थ येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन

ता.द. सोलापूर तिर्थ येथे क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आले याप्रसंगी वळसंग पोलीस स्टेशनचे वरीष्ठ अधिकारी अनिल सणगल्ले साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी साहेबांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खेळण्याकरता मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम या संस्थेचे अध्यक्ष डॉ भीमाशंकर बिराजदार यांचे आभार मानले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळामध्ये निपुण असतात त्यांच्या जिद्द चिकाटी आणि परिश्रम करण्याची क्षमता असते अशा विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात खेळाचे मैदान व साहित्य उपलब्ध केल्यास मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असते व अशातूनच क्रीडा क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील मुलं चमकत असतात मी स्वता पण कबड्डीतला उत्कृष्ट खेळाडू होतो व अनेक बक्षीस व पारितोशिक घेतले आहे असे आपल्या मनोगता मधे सांगीतले आहे

याप्रसंगी शाळेतील प्राचार्य सुधीर सोनकवडे श्री मल्लिनाथ बंदीछोडे पो कॉ भिमाशंकर कलकुटे श्री नागराज पाटील श्री सचिन गुंजा श्री अमर पाटील श्री सिद्धाराम पाटील श्री स्वामी सर सौ तांदळे मॅडम श्री महेश पट्टणशेट्टी श्री गुरुशांत बिराजदार श्री बाबासाहेब धोडमिसे व गावकरी ऊपस्थीत होते
