माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्यांनी भारताचे नाव अनेक क्षेत्रात मोठे केले. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी, मुत्सद्दी राजनीतिज्ञ म्हणून अटलजी आजही अगणित लोकांना प्रेरणा देत असतात.; प्राचार्य डॉ. शिवराय अडवीतोट
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती 'गुड गवर्नेंस डे' अर्थात सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्यांनी भारताचे नाव अनेक क्षेत्रात मोठे केले. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी, मुत्सद्दी राजनीतिज्ञ म्हणून अटलजी आजही अगणित लोकांना प्रेरणा देत असतात.; प्राचार्य डॉ. शिवराय अडवीतोट

गावगाथा वृत्तसेवा
अक्कलकोट, दि. २५- अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती ‘गुड गवर्नेंस डे’ अर्थात सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवराय अडवीतोट हे होते.
प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. अडवितोट यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. अडवितोट म्हणाले,
अटलबिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी भारताचे नाव अनेक क्षेत्रात मोठे केले. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी, मुत्सद्दी राजनीतिज्ञ म्हणून अटलजी आजही अगणित लोकांना प्रेरणा देत असतात. 21व्या शतकात प्रवेश करताना भारताच्या स्थित्यंतराचे शिल्पकार म्हणून आपला देश अटलजी प्रति सदैव कृतज्ञ राहील.
त्यांच्या आजच्या शंभराव्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या आदर्शाची जाणीव जिवंत ठेवण्यासाठी आणि भारतासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला पुन्हा झोकून देऊया. सुशासन, एकता आणि प्रगती या त्यांच्या तत्त्वांना मूर्त रूप देणारा भारत घडवण्याचा आटोकाट प्रयत्न करूया. आपल्या देशाच्या क्षमतेवर असलेला अटलजींचा अढळ विश्वास आपल्याला उच्च ध्येय आणि कठोर परिश्रम करण्यासाठी सतत प्रेरणा देत आला आहे आणि यापुढेही देत राहील.
अशा महान व्यक्ती दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आचार आणि विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख प्रा. विठ्ठल वाघमारे, बीसीएचे प्रा. प्रिती चव्हाण, कार्यालयीन लिपिक अशोक कोरे, विरुपाक्ष कुंभार, दिनेश धाराशिवकर, कर्मचारी बालाजी घंटे, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
