*श्री कल्मेश्वर प्रशाला सुलेरजवळगे येथे ‘राष्ट्रीय गणित दिन’ उत्साहात साजरा.*
गणित दिन विशेष

*श्री कल्मेश्वर प्रशाला सुलेरजवळगे येथे ‘राष्ट्रीय गणित दिन’ उत्साहात साजरा.*

श्री कल्मेश्वर प्रशाला सुलेरजवळगे येथे दि. 23/12/24 रोजी गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत गणितीय साहित्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाची सुरवात श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक श्री विश्वनाथ पालवे यांच्या हस्ते करून करण्यात आले. यावेळी प्रशालेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणितीय कोडे, उखाणे, गणितीय गीते, मनोगते व्यक्त केले.
सदर गणित प्रदर्शनाचे उदघाटन श्री विश्वनाथ पालवे व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आदेप्पा कापसे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. प्रशालेतील गणित विषय शिक्षक श्री मंगेश स्वामी यांनी आपल्या प्रस्तावनेत कार्यक्रमाची रूपरेषा सांगत गणित दिवसाचे महत्व विषद केले. तसेच सहशिक्षिका श्रीम. आकळवाडी यांनी मानवी जीवनात गणिताचे महत्व सांगत विद्यार्थ्यांना माहिती सांगितले. या प्रदर्शनात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन विविध प्रकारचे गणितीय मॉडेल बनवले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देविदास गुरव यांनी तर आभार श्री सुयश खुने यांनी केले.
