गावगाथा

“छ.शिवाजी महाराज कल्याणकारी राजे होते.”——–प्रा.डॉ. बिराजदार

शिवजयंती उत्सव विशेष

“छ.शिवाजी महाराज कल्याणकारी राजे होते.”——–प्रा.डॉ. बिराजदार

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर…. दि.१९.हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन मानवतेची सेवा करण्याचे सामर्य्थ ज्या जिजाऊ मातेने छ.शिवाजी महाराजांच्या मन, मनगट आणि मेंदूत रुजविले .प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे हिंदवी स्वराज्य बहरत जावो त्यातून सामान्य माणसाचे जीवनमान उंचावून लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण व्हावे.अशा जाज्वल्य स्वराज्य भक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वप्न सत्यात आणणारे द्रष्टे राजे ठरले.म्हणून शिवाजी राजे हे रयतेचे व सामान्याचे उध्दारक राजे झाले.असे मननीय विचार प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी श्री सिध्देश्वर सार्वजनिक वाचनालय व महालक्ष्मी सार्वजनिक सोलापूर आयोजित शिवजयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक ग्रंथपाल कुमार जम्मा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल गुरुनाथ हत्तीकाळे यांनी केले. कार्यक्रमास किरण भंडारी, श्रीशैल शिळ्ळे, महेश केंदळे,लक्ष्मीकांत श्रीराम, रचना मारगम,मोनिका दासरी व वाचक मोठया संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button