गावगाथा

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल घोषित

विविध निकाल

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल घोषित

गावगाथा: मुंबई प्रतिनिधी

मुंबई -यंदा वृत्तपत्र लेखक चळवळीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केला असून मनोरंजनकर का. र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक म्हणून अवतरण सकाळ, मुंबई (संपादक – राहुल गडपाले) या अंकाची निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय धुरू हॉल ट्रस्ट, मराठी विचारधारा प्रतिष्ठान आणि पार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा दिनी दादर सार्वजनिक वाचनालय, धुरू हॉल येथे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ग्रंथालय चळवळीसाठी योगदान दिलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचे प्रवर्तक विनायक रानडे (नाशिक) यांना ‘स्व दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मनसे विभागध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या पार्थ फाउंडेशन यांनी पुरस्कृत केलेल्या ‘मराठी भाषेची चिंता आणि चिंतन’ या विषयावर स्व-बोलीभाषेत कवी कुसुमाग्रजांना अनावृत्त पत्रलेख स्पर्धा आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव पुरस्कृत ‘माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्य आणि व्यवहारातील स्थान’ या दोन लेख स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे असे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी कळविले आहे. परीक्षक म्हणून सुनील सुर्वे (ग्रंथालय प्रमुख – केळकर कॉलेज), दत्ता मालप (प्रत्युष जाहिरात कंपनीचे प्रमुख ) यांनी काम पाहिले, पारितोषिक प्राप्त दिवाळी अंकांची यादी पुढीलप्रमाणे

१) मनोरंजनकार’ का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – अवतरण सकाळ (राहुल गडपाले,मुंबई )
२) चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक – अक्षर (मीना कर्णिक, मुंबई)
३) पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक – सामना (संजय राऊत, मुंबई)
४) पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – चंद्रकांत (श्रीमती नीलिमा कुलकर्णी, मुंबई)
५) साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट युवकांसाठी अंक – उद्याचा मराठवाडा (राम शेवडीकर,नांदेड)
६) मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक – मनोरमा, (सौ शोभा श्रीकांत मोरे, सोलापूर)
७) कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक -द इनसाइट (विनायक पाचलग, मुंबई)
८) पांडुरंग रा भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक – वेदान्तश्री (सुनील उंब्रजकर, पुणे)

संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘स्व. विजया मनोहर कोळसकर स्मृती अमृतप्रेरणा’ पुरस्कारासाठी पुढील अंकांची निवड करण्यात आली आहे.

गोमंतक,संपादक – राजू नायक (गोवा), सर्जनशील तेचा नवाविष्कार – संपादक प्रा डॉ वर्षा खडसे रणदिवे (नवी मुंबई ), हेमांगी – ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, (मुंबई ), ऋतुरंग – अरुण शेवते ( मुंबई ), वाघूर – नामदेव कोळी (जळगाव), लोकशाही वार्ता – भास्कर लोंढे ( नांदेड ), अपेक्षा – दत्तात्रय उभे (पुणे ), वसंत – दिलीप देशपांडे (मुंबई ), प्रतिभा साहित्य वारी – निलेश गायकवाड (ठाणे), सर्वोत्तम – अश्विन खरे (इंदूर), गुंफण – बसवेश्वर चेणगे (सातारा)

याशिवाय उत्कृष्ट अंक म्हणून – आनंद तरंग – पराग पोतदार (पुणे), एकमेव वेगळा – प्रकाश पानसे (ठाणे), शब्द शिवार – इंद्रजित घुळे (मंगळवेढा), अर्थशक्ती – रमेश नार्वेकर (मुंबई), आर्याबाग – कल्याण तावरे (पुणे), शब्द संवाद – निलेश पवार (महाड), विनर्स – विनोद शिंदे (पुणे), शेतीप्रगती – रावसाहेब पुजारी (कोल्हापूर), जलोपासना – डॉ दत्ता देशकर (पुणे), मुक्त संवाद – डॉ विवेक कोरडे (मुंबई), ऋतुपर्ण – सुरेंद्र गोगटे (पुणे), युवावार्ता – किसन हासे (संगमनेर), पुरुष उवाच – डॉ गीताली वि मं (पुणे), वारसा – जयंत येलूलकर (अहमदनगर) त्याचप्रमाणे उल्लेखनीय अंक म्हणून – शब्दमल्हार – स्वानंद बेदरकर (नाशिक), सृजनसंवाद – गीतेश शिंदे (ठाणे), साहित्य सावाना – प्रा अनंत येवलेकर (नाशिक), सृजनदीप – डॉ आनंद कांबळे (हडपसर), तेजोमय – डॉ दत्तात्रय शिंदे (पुणे), दुर्गांच्या देशातून – संदीप तापकीर (पुणे), अद्वैत – राजन चव्हाण (सिंधुदुर्ग), साहित्य संगम – उमाकांत वाघ (विरार), गावगाथा – धोंडप्पा नंदे (अक्कलकोट)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button