मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान; जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर अक्कलकोट तालुक्यात प्रथम
स्पर्धेतील यशाबद्दल तीन लाखांचे शाळेस बक्षीस जाहीर

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान; जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर अक्कलकोट तालुक्यात प्रथम

स्पर्धेतील यशाबद्दल तीन लाखांचे शाळेस बक्षीस जाहीर

राज्य शासनाकडून शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान सुरू आहे.या उपक्रमाअंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथील शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व सहशालेय उपक्रमात सदैव अग्रेसर असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेमध्ये गुजरात येथील कलाकाराकडून केलेली रंगरंगोटी, अक्कलकोट तालुक्यातील प्रथम क्रमांकाची आणि सोलापूर जिल्हा स्तरावरील तृतीय क्रमांकाची परसबाग, विद्यार्थी बचत बँक, विविध व्याख्यानांचे आयोजन, वर्ग सजावट, क्षेत्रभेट, विद्यार्थी विविध गुणवत्ता शोध मध्ये जिल्हा स्तरापर्यंत मिळविलेले यश यांसारख्या अनेक बाबींच्या आधारावर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेतील यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेसाठी तीन लाखांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.
‘ माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे , विस्तार अधिकारी दयानंद कवडे, केंद्रप्रमुख सुरेश शटगार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.मराठी सलगर शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेतील यश संपादन केल्याबद्दल सलगर गावचे सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य तसेच इतर सर्व स्तरावरून शाळेचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यासाठी शाळेचे शिक्षक यल्लाप्पा पुटगे, हणमंतराव गुंडरगी, मल्लिनाथ चनपटणे, हाजराबी बागवान, संध्या बशेट्टी, दिनकर भारती आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
