
*चपळगाव प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस संपन्न!*

चपळगाव
03 जानेवारी संपूर्ण भारतात भारतीय स्त्री -शिक्षणाचे अग्रदूत, सामाजसुधारक,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते.
ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चपळगाव येथे गणित व विज्ञान विषयाचे शिक्षिका श्रीमती गुरव मॅडम यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व्यासपीठावर सर्व शिक्षिका वर्ग आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रा.संतोष नरे सरांनी भारतीय संविधानाचे महत्व व वैशिष्ट्य याबाबत उद्धबोधन केले.
याप्रसंगी प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल आणि प्रशालेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांचे बालपण, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल आपापले मनोगत व्यक्त केले.
विशेष करून काही मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या पोशाखात उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्राचार्य माने सर, पर्यवेक्षक बानेगाव सर, CEO नीलकंठ पाटील सर, सेमी इंग्लिश स्कूल प्रमुख शेख मॅडम आणि सर्व विभागातील गुरुजन वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिनाथ पाटील सर केले तर आभार दुलंगे सरांनी मानले.
