गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: सिन्नूर येथील जिल्हा परिषद कन्नड, मराठी व उर्दू शाळा वतीने ‘बाल आनंद’ मेळावा संपन्न

सिन्नूर (प्रतिनिधी ): येथील बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन सिन्नूर गावातील शिक्षण प्रेमी श्री परमेश्वर सायाबण संगापुर यांचा हस्ते करण्यात आले. या वेळी कन्नड शाळेचे मुख्याध्यापक रमेश घोदे , मराठी शाळेचे मुख्याध्यापिका भाग्यश्री कोष्टी आणि उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अजम पटेल, ज्येष्ट शिक्षक मल्लिनाथ भुसणगी  उपस्थित होते.

तसेच कन्नड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरणबसप्पा सिद्धाराम जेवरगी , मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  जगदीश विठ्ठल उजनी व उर्दू शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष चांदसाब इब्राहिम पठाण, सिन्नूर गावचे उप सरपंच श्री प्रकाश बाबुराव कळसगोंड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य  दत्तप्प जेवर्गी , महेश हौदे, शरणबसप्पा अंतरगंगी, शिवपुत्र देवेंद्र जेवर्गी, सिराज पठाण, सैपन मुल्ला, शब्बीर शेख, संजय चौगुले, संगप्पा वड्डर आदि सह शाळेतील सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते..
बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळते. मुलांना व्यवसायाची मांडणी, हिशोब, मार्केटिंग, संवाद कौशल्य विकास होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरते. सर्व विद्यार्थी बाल आनंद मेळाव्यात विविध खाद्य पदार्थ, भाजी पाला, फळे, पाणी पुरी, भेळ, स्वीट कॉर्न, दोसा, कांदा भजी इत्यादी विक्री करून हजारो रुपयांची उलाढाल केली.

सदरील बाल आनंद मेळावा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिकान भारती म्हेत्रे , श्रीशैल खानापुरे ,  बसवराज कर , गणेश ओहोळ , विकास बोर्गीकर, आणि अतिथी शिक्षिका वैष्णवी परमशेट्टी आणि  भारत राठोड, बांगी आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button