गावगाथा

स्वामीकृपेने कब्बडीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नावलौकीकाने जीवनाचे सार्थक

स्वामी दर्शनानंतर स्टार कब्बडीपटू पंकज मोहीते यांचे मनोगत

स्वामीकृपेने कब्बडीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नावलौकीकाने जीवनाचे सार्थक

स्वामी दर्शनानंतर स्टार कब्बडीपटू पंकज मोहीते यांचे मनोगत

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.८/१/२०२५)
कब्बडी हा आपल्या राष्ट्रीय स्तरावरचा मर्दानी खेळ आहे. आयपीएलच्या धर्तीवर भारतातील काही मोठया उद्योजकांनी कब्बडी या खेळास आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रो.कब्बडी लीगच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून देशभरातील कब्बडी खेळांडूंना आपले कौशल्य सिध्द करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. स्वामी कृपेने मलाही ही संधी लाभल्याने कब्बडीच्या माध्यमातून लाभलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नावलौकीकाने जीवनाचे सार्थक झाले असल्याचे मनोगत प्रो.कब्बडी लीग मधील पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू पंकज मोहीते यांनी व्यक्त केले. प्रो कब्बडी लीग २०२४ स्पर्धांच जेतेपद पुणेरी पलटणने पटकावल्यानंतर कब्बडीपटू पंकज मोहीते यांनी नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सपत्निक भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी कब्बडीपटू पंकज मोहीते व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी पंकज मोहीते बोलत होते. यावेळी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी मी ही कब्बडी खेळाचा व पुणेरी पलटण संघाचा मोठा चाहता आहे. नुकतेच पार पडलेल्या प्रो कब्बडी लीग २०२४ स्पर्धांच जेतेपद पुणेरी पलटणने जिंकली. ७४ दिवसांच्या अतितटीच्या १२ संघांमध्ये रंगलेल्या सामन्यानंतर हरयाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण यांनी अंतिम फेरीत एन्ट्री मारली होती. पुण्याने हरयाणावर २८-२५ ने मात दिली. अवघ्या ३ गुणांनी पुण्याने हरयाणाला पराभूत केलं. पुणेरी पलटणने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कोर्टात राहणं पसंत केलं. हरयाणाच्या विनयची पहिली रेड फुकट गेली. त्यानंतर पुण्याने हरयाणावर आघाडी घेण्यास सुरुवात केली. पहिल्या ब्रेकमध्ये पुण्याने हरयाणा स्टीलर्सवर १०-१३ गुणांनी आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही पुण्याने आघाडी घेतली. पण एक क्षण असा आला की या दोन्ही संघातील अवघ्या काही गुणांचं होतं. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली होती. मध्येच जल्लोष करणारा प्रेक्षकवर्ग शांत होत होता. तर कधी आपल्या बाजूने कल लागला जोराने ओरडत संघाला साथ देत होती. दुसऱ्या डावात जेव्हा अतितटीचा सामना सुरु होता पंकज मोहितेची रेड पुण्याला फायदेशीर ठरली. त्याच्यचा ४ गुणांमुळे पुणेरी पलटणला फायदा होवून अंतिम सामन्यात विजय झाल्याने व पुणेरी पलटणला अजिंक्यपद प्राप्त झाल्याने माझ्यासह पुणेरी पलटणच्या तमाम चाहत्यांना विशेष आनंद झाला असल्याचे सांगून या पुढेही पंकज मोहीते यांनी असेच निर्भेळ यश संपादन करीत रहावे हीच स्वामींच्या चरणी मनोकामना असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, मोहन जाधव, विपूल जाधव, शिवशरण अचलेर, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – कब्बडीपटू पंकज मोहीते यांचा वटवृक्ष मंदीरात सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button