स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, मंदीर समितीचे चेअरमन, नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते ‘स्वामी हो’ या भक्तीगीत ध्वनीमुद्रणे संचचे लोकार्पण.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कै.कल्याणराव इंगळे सभामंडपात संपन्न झाला लोकार्पण सोहळा.

नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, मंदीर समितीचे चेअरमन, नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते ‘स्वामी हो’ या भक्तीगीत ध्वनीमुद्रणे संचचे लोकार्पण.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या
कै.कल्याणराव इंगळे सभामंडपात संपन्न झाला लोकार्पण सोहळा.
पोलीस कर्तव्य आणि स्वामी भक्तीचा संगम – नगरसेवक महेश इंगळे
सोलापूर जिल्ह्यात प्रथमच स्थानिक गायकाचा मान
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२४/०२/२६)
श्री स्वामी समर्थांची अनेक भक्तीगीते आजपर्यंत बाहेरील कलाकारांनी गायलेली आहेत. यंदा अक्कलकोटच्या भूमिपुत्राने स्वतः स्वामींचे गायलेले भक्तीगीतांना स्वामी भक्तांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे,
ही बाब सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच घडल्याने हा विषय अक्कलकोट करांसाठी व आम्हा देवस्थान विश्वस्त पदाधिकाऱ्यांसाठी विशेष अभिमानाचा क्षण असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. आज
नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले अक्कलकोटचे सुपूत्र रोहित राठोड यांनी गायलेल्या ‘स्वामी हो’ या भक्तीगीतांचा ध्वनीमुद्रणे संच लोकार्पण सोहळा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरातील कै.कल्याणराव इंगळे सभामंडपात भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे, उपनगराध्यक्ष ऋतुराज बंटी राठोड, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी महेश इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मा. निशिकांत सदाफुले, मा.नेहरिका सदाफुले, योगेश राठोड, मा.नेताजी भाऊ खंडागळे, मा.भीमराव विश्वनाथ राठोड, मा.रमेश राठोड, मा.खेमु राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी पोलीस सेवेतील जबाबदाऱ्या सांभाळत स्वामी भक्ती जोपासून साकारलेले हे भक्तीगीत सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.श्री स्वामी समर्थ यांच्या पावन भूमीत सादर झालेल्या या गीताने उपस्थित भक्तांना आध्यात्मिक अनुभूती दिली. आजपर्यंत स्वामींची अनेक भक्तीगीते बाहेरील कलाकारांनी गायलेली असताना, अक्कलकोटच्या भूमिपुत्राने स्वतः स्वामींचे भक्तीगीत गायले हा बाब आपणांसह अक्कलकोट वासियांसाठी व मंदीर समितीसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून गायक रोहित राठोड यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मंदीर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कलेचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, नगरसेवक नन्नू कोरबू, तम्मा शेळके, शिवू स्वामी, बाळा शिंदे, मनोज इंगुले, अंकूश केत, सुनिल पवार,
प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, श्रीशैल गवंडी, व्यंकटेश पुजारी, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, शिवाजी गुजर, विपूल जाधव आदींसह राठोड, चव्हाण, पवार परिवार व मित्रमंडळ व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(चौकट – श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ही सेवा साकारली आहे.
हे गीत मी स्वामी चरणी अर्पण केले असून पुढेही भक्तांसाठी अशीच भक्तीगीते सादर करत राहीन – गायक, तथा पोलीस सेवक रोहित राठोड, नवी मुंबई)
फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरातील कै.कल्याणराव इंगळे सभामंडपात स्वामी हो’ या भक्तीगीतांचा ध्वनीमुद्रणे संच लोकार्पण करताना नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे, उपनगराध्यक्ष ऋतुराज बंटी राठोड, प्रथमेश इंगळे व अन्य मान्यवर दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button