
लायन्स क्लब इंटरनॅशनलकडून मैदर्गी, चप्पळगाव येथे मदतीचे वाटप

अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्याची दखल घेऊन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे यांनी लायन्स क्लब इंटरनॅशनलला तातडीची मदत मागितली होती. कापसेंच्या प्रयत्नाला यश येऊन ती मदत मंजूर झाली.
आलेल्या मदतीचे वाटप दुसऱ्या टप्प्यात वस्तूरुपात करण्यास सुरू करण्यात आली. मैंदर्गी व चप्पळगाव येथे अनेक नुकसानग्रस्तांना चादरीचे वाटप करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे, लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष मल्लिकार्जून मसुती, लायन्स ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र हत्ते, प्रांतीय सचिव सुभाष गडसींग, ट्रस्ट सचिव शिवशरण खूबा, ला कल्यानी आळगी, मेंदर्गी चे तुकप्पा नागुर, राजशेखर मसुती, सुरेश नागुर, काशिनाथ दिवटे, दयानंद बामनल्ली, सिद्धाराम जकापुरे, शिवशरण भरमा, चप्पळगावचे सरपंच उमेश पाटील, के बी पाटील, अंबणप्पा भंगे, महेश पाटील, शेखर पाटील, श्रावण गजधाने, महेबुब तांबोळी, ज्ञानेश्वर कदम, शंभुलिंग अकतणाळ, भूमिपुत्र संघटनेचे पदाधिकारी हे उपस्थित होते. असे दोन्ही गावातील प्रमुख व्यक्तीं उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने लायन्स इंटरनॅशनलचे आभार मानले व लायन्सच्या अश्या सेवा उपक्रमाचे अभिनंदन करून कौतुक केले.
