*जि.प.प्राथ. मराठी केंद्रशाळा जेऊर या शाळेची वनभोजन व हुरडा पार्टी उत्साहाने संपन्न*
हुरडा पार्टी

*जि.प.प्राथ. मराठी केंद्रशाळा जेऊर या शाळेची वनभोजन व हुरडा पार्टी उत्साहाने संपन्न*

बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु,
झाडे, वेली , पशू, पाखरे
यांच्या गोष्टी करू.
या गदिमांच्या कवितेप्रमाणे शालेय उपक्रमाबरोबर वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळा कडून आयोजन केले जाते . यावेळी मुलांना आढळणारे विविध पक्षी ,वृक्ष , सेंद्रिय शेती पशुपालन व कुक्कुट पालन याची ओळख करून दिली जाते.
*अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा जेऊर* या शाळेने यावर्षी *वनभोजन* या उपक्रमाचे आयोजन जेऊर गावातील *सेंद्रिय शेतीचे प्रणेते, शिक्षणप्रेमी, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सदैव धडपडणारे श्री सुरेश बोरीकरजगी (मामा) व त्यांचे चिरंजीव श्री बसवराज सुरेश बोरीकरजगी यांच्या निसर्गरम्य शेतात आयोजित करण्यात आले होते.सदैव काहीतरी नवनवीन प्रयोग करणारे श्री सुरेश बोरीकरजगी (मामा ) यांनी 150 विद्यार्थ्यांसाठी *हुरडा पार्टीचे* आयोजन केले होते . त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी *गोड खीर ,चटणी, आमटी व भात यांचा मनसोक्त आस्वाद घेतला* .
*निसर्गरम्य वातावरण, आंब्याची वनराई आणि नारळाच्या दाट सावलीत मुलांनी गाणी, खेळ , नृत्य, नकला व नाट्यीकरण सादर केले*.
याप्रसंगी करजगी बीटाचे बेटविस्तार अधिकारी *श्री स्वामी साहेब* यांनी वनभोजन कार्यक्रमास सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी झाले व विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. गौडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री *धडके साहेब* जेऊर केंद्राचे केंद्रप्रमुख *श्री मोरे साहेब* शा .पो.आ . तालुका समन्वयक *श्री गुरव सर* जेऊर मराठी शाळेचे SMCअध्यक्षा *सौ कापसे ताई* , कन्नड शाळेचे SMC अध्यक्ष श्री *रवी स्वामी* , *श्री सिद्धाराम कापसे*,SMC सदस्य *विजयकुमार भणगे*, अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष *श्री शंकर अजगोंडा सर*,पत्रकार *श्री कुलकर्णी सर* , *श्री शिंगे सर श्री ढंगे सर ,श्रीशैल स्वामी सर श्री वज्रवाड सर, पंडीत गुरव. गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक वर्ग शिक्षक वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते* .
*जेऊर मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गंगाधर जमादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली वनभोजनाचा कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाला*.
