गावगाथाठळक बातम्या

Pune traffic: उद्या पुण्याच्या वाहतूकीत मोठा बदल ; हे रस्ते राहणार बंद

पुणे ( प्रतिनिधी): सेना दिन संचलन कार्यक्रमास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बुधवारी (दि. १५) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे चंद्रमा चौक, होळकर पुलादरम्यान सकाळी सात ते अकराच्या सुमारास वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

आळंदी रस्ता चौक ते चंद्रमा चौक, चंद्रमा चौक ते होळकर पुलादरम्यान दुतर्फा वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. खडकीतील हॅरिस पूल, नगर रस्त्यावरील खराडी बाह्यळण मार्ग, शास्त्रीनगर चौक, शादलबाबा चौक, विश्रांतवाडी चौकातून येरवड्याकडे जाणाऱ्या जड वाहनांना सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

 

असे आहेत वाहतुकीत बदल…

 

शादलबाबा चौक ते चंद्रमा चौकामार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी शादलबाबा चौक, डॉ. आंबेडकर चौक, आळंदी चौक, विश्रांतवाडीतील साप्रस पोलिस चौकी, जुना होळकर पुलामार्गे इच्छितस्थळी जावे.

विश्रांतवाडीकडून होळकर पुलामार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

विश्रांतवाडी, साप्रस पोलिस चौकीमार्गे, जुना होळकर पुलामार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.

बोपोडी चौक, खडकी बाजार, चर्च चौकादरम्यान होळकर पूल, येरवड्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी पाटील इस्टेट, वाकडेवाडीमार्गे इच्छितस्थळी जावे.

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरून अंडी उबवणी केंद्र (पोल्ट्री चौक) परिसरातील भुयारी मार्गातून मुळा रस्तामार्गे खडकी बाजारकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button