सरपंच परिषद यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रकाशन
दिनदर्शिका प्रकाशन

सरपंच परिषद यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रकाशन

अक्कलकोट : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा ग्राम विकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे साहेब, आमदार श्री सचिन (दादा) कल्याणशेट्टी व जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांच्या हस्ते सोलापूर मध्ये करण्यात आले.

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या सोलापूर जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, जिल्हा समन्वयक वनिताताई सुरवसे, अमोल दुरंदे व इतर पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सरपंच दिनदर्शिका दरवर्षी तयार केली जात आहे. सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत विकास कामांसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू असे आश्वासन ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी प्रकाशनावेळी दिले.

परिषदेमार्फत सर्व सरपंचाच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवताय आणि आम्ही त्याचे निराकरण शंभर टक्के करतोय, पुढेही सरपंच परिषदेचे असेच काम चालू राहू द्या, जिल्हा समन्वयक सौ वनिता ताई यांनी दरवर्षी अक्कलकोट तालुक्यात तीन हजार व सोलापूर जिल्ह्यात तीस हजार हजार दिनदर्शिका वाटप करत असतात, गेल्या 3 वर्षांपासून त्यांचे कॅलेंडर सर्वांना पोहचत आहे, त्यांच्या हातून असेच समाजकार्य घडो अशा शुभेच्छा जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी सरपंच परिषद व सरपंच सौ वनिता सुरवसे यांना दिल्या.

या प्रकाशन सोहळ्यास आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी श्री कुमार आशिर्वाद, प्रदेश उपाध्यक्ष ऍड विकास जाधव, गोगावच्या सरपंच तथा सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्ह्याच्या समन्वयक सौ.वनिता सुरवसे, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, जिल्हाध्यक्ष कविताताई घोडके, भागातील सरपंच व इतर पदाधिकारी उपस्थीत होते.
