गावगाथा

औषध निर्मितीतील नाविन्यपूर्ण मॉडेलचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पुरस्कार वितरण सोहळा

औषध निर्मितीतील नाविन्यपूर्ण मॉडेलचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

मुरूम, ता. उमरगा, ता. २८ (प्रतिनिधी) : उमरगा येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून औषध निर्मितीतील नाविन्यपूर्ण मॉडेल सादरीकरण पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (ता. २७) रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. डॉ. ज्योती पेठकर, प्रा. पोळकर, माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुशील मठपती, फार्मसीचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. रजनंदिनी लिमये, प्रा. सदफअलमास मुजावर, प्रा. प्रियंका काजळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. ज्योती पेठकर म्हणाल्या की, डिजिटल तंत्रज्ञानाच्या काळात औषध निर्मितीमध्ये अमुलाग्र व नाविन्यपूर्ण संशोधन होणे गरजेचे आहे. रुग्णांच्या सोयीसाठी झटपट प्रभावी औषध शोधणे, आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांमध्ये आधुनिक विज्ञानाची सांगड घालून नवीन संशोधन केले पाहिजे. औषधनिर्मितीत शाश्वत आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी करावा. औषध निर्मितीतील २८ मॉडेल सादरीकरणातून हर्षदा सूर्यवंशी, औषधांच्या पॅकिंग इंडस्ट्री (प्रथम), नबीलाल जमादार, आकांक्षा इंगळे व सुरज गडवे, फार्मसी औद्योगिक मॉडेल (द्वितीय), सृष्टी शिंदे, रश्मी बायस, महादेव जाधव व पवन थोरात, (तृतीय) क्रमांक पटकावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. सुदीप ढंगे, प्रा. राहुल इंजे, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. अनिल मोरे, प्रा. विवेकानंद चौधरी, प्रा. लखन पवार आदींचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पायल आगरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनंती बसवंतबागडे तर आभार यांनी मानले. यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने आयोजित बक्षीस वितरण प्रसंगी डॉ. ज्योती पेठकर, डॉ. सुशील मठपती व प्राध्यापक-प्राध्यापिका व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button