14 वे वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचे धर्मपत्नी शांभवीताई सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाला.
वार्षिक अधिवेशन

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
14 वे वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचे धर्मपत्नी शांभवीताई सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाला.

या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक चे प्राचार्य नागनाथ जेऊरे,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, महाराष्ट्र राज्य गणित महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रमेश आदलिंगे, राज्य गणित महामंडळ प्रकाशन समिती प्रमुख शिवशरण बिराजदार, सोलापूर जिल्हा गणित मंडळाचे जिल्हाध्यक्ष संजय भस्मे, कार्याध्यक्ष शिवाजी चौगुले, सचिव प्रीतम माशाळ, परीक्षा प्रमुख समीर कुलकर्णी,माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत चोरमले, नीलकंठ लिंगे आदी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमा पूजन, थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन, महात्मा गांधी यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थिनींनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले. उद्घाटन समारंभ नंतर प्रमुख वक्ते उत्कर्ष जैन व वसंत गवळे यांचे व्याख्यान संपन्न झाले.

दुसऱ्या सत्रात दुपारी 3:30 वाजता पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शुभहस्ते जीवनगौरव आणि आदर्श गणित शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व जीवनगौरव पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आदर्श गणित शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून आमदार जयंत आसगावकर म्हणाले, गणिताचे ज्ञान आणि वापर हा व्यक्ती आणि समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तो सोप्या पद्धतीने शिकविण्याचे काम आमचे शिक्षक बांधव करतात. आज शासन आमच्या शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादून त्यांना वेठीस धरत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. ‘शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू’ द्या या मताशी मी ठाम आहे. निवडून आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. उर्वरित इतर प्रश्नही मार्गी लावण्यास मी कटिबद्ध आहे.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे , तहसीलदार विनायक मगर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी मा. पंचायत समिती सभापती मल्लिकार्जुन पाटील, वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हाळप्पा सुरवसे, नायब तहसीलदार संजय भंडारे, श्रावण बिराजदार, महेश सरवदे, वैजनाथ हत्तुरे, अण्णासाहेब गायकवाड, लक्ष्मण चलगेरी, सचिन झाडबुके, विद्यानंद स्वामी, रामचंद्र जानकर यांच्यासह संयोजक अक्कलकोट तालुका गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष कल्लप्पा बुळळा, उपाध्यक्ष स्वप्नाली जमदाडे, सचिव बसवराज शावरी, परीक्षा प्रमुख शिवानंद पुजारी, सर्व गणित मंडळाचे पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व गणित विषय शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
