महाकुंभमेळ्यातील शाही स्नानाकरीता महेश इंगळे – प्रथमेश इंगळे मित्र परिवारचे प्रयागराजकडे प्रस्थान
कुंभमेळा विशेष

महाकुंभमेळ्यातील शाही स्नानाकरीता महेश इंगळे – प्रथमेश इंगळे मित्र परिवारचे प्रयागराजकडे प्रस्थान

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.३१/०१/२५) –
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष महेश इंगळे – प्रथमेश इंगळे मित्र परिवार यांनी उत्तर प्रदेश प्रयागराज त्रिवेणी संगम येथील महाकुंभमेळ्यातील शाही स्नानाकरीता आज पहाटे ५ वाजता प्रस्थान केले. या कुंभमेळ्यातील शाही स्नाना करीता महेश इंगळे – प्रथमेश इंगळे यांच्यासह महेश इंगळे – प्रथमेश इंगळे मित्र परिवारपैकी संतोष पराणे, अंकूश केत, श्रीकांत झिपरे, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, सुरेश वाले, श्रीशैल गवंडी, संजय पवार, मनोज इंगुले, सागर गोंडाळ, दर्शन घाटगे, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे, धनराज स्वामी, स्वामीनाथ मुसळे आदींनी प्रयाण केले आहे. १४४ वर्षानंतरच्या अमृत योगाने आलेल्या महाकुंभमेळ्यात उत्तर प्रदेश मधील प्रयाग्रज येथील गंगा, यमुना, सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील आखाड्यात दि.३ फेब्रुवारी रोजी महेश इंगळे – प्रथमेश इंगळे यांच्यासह सर्व मित्रपरिवारचे सदस्य पवित्र शाही स्नान करतील. या प्रसंगी बोलताना संतोष पराणे यांनी महाकुंभमेळ्यात संगमावर जाऊन स्नान करणे हा जीवनातील एक अमृत योग आहे. अक्कलकोट ते प्रयागराज (व्हाया अयोध्या, काशी) असे सुमारे १८७० किलोमीटरचा प्रवास करून हा अमृत योग महेश मालक इंगळे यांच्या कृपेने आमच्या जीवनात लवकरच येणार आहे.
यानिमित्ताने जीवनातील या एका अविस्मरणीय क्षणाचे भागीदार होण्याचे भाग्य भाग्यविधाते महेश मालक इंगळे यांच्यामुळे लाभले असल्याचे मनोगत महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्रपरिवारच्या उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले.

फोटो ओळ – महाकुंभमेळयातील स्नाना करीता प्रस्थान करताना घेतलेल्या छायाचित्रात महेश मालक इंगळे, प्रथमेश इंगळे व मित्र परिवार सदस्य दिसत आहेत.
