महाकुंभमेळ्यात महेश इंगळे- प्रथमेश इंगळे मित्र परिवारचे प्रयागराज त्रिवेणी संगमावर शाही अमृत स्नान.
हरिद्वारचे स्वरयोग पीठाधिश्वर श्री.श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी चरणश्रित गिरी महाराजांच्या दिव्य सान्निध्यात व करोडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला शाही अमृत स्नान सोहळा.

महाकुंभमेळ्यात महेश इंगळे- प्रथमेश इंगळे मित्र परिवारचे प्रयागराज त्रिवेणी संगमावर शाही अमृत स्नान.

हरिद्वारचे स्वरयोग पीठाधिश्वर श्री.श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी चरणश्रित गिरी महाराजांच्या दिव्य सान्निध्यात व करोडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला शाही अमृत स्नान सोहळा.

हे श्री.स्वामी समर्था, हे गंगा मैय्या तुझ्या भक्तीचा वसंत साऱ्यांच्या हृदयात फुलू दे

प्रयागराज महाकुंभमेळ्यात ‘गंगा-यमुना- सरस्वती’ नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसंत पंचमीच्या ब्रह्ममुहूर्तावर अमृत स्नानानंतर महेश इंगळे यांचे गंगाजींच्या चरणी साकडे

(श्रीशैल गवंडी, )
जीवन व वसंताला ज्याने एकरूप केले आहे, अशा व्यक्तीलाच आपली संस्कृती
संत म्हणते. जो जीवनात वसंत आणतो, तोच संत असतो.
यौवन आणि संयम, संकल्प आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन आणि विसर्जन या सगळ्यांचे समन्वय साधणारा आणि जीवनात सौंदर्य, संगीत व स्नेह निर्माण करणारा असा हा वसंत ऋतू आहे. हा वसंत आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावा याकरिता सदगुरु श्री स्वामी समर्थांना वंदन करून आज प्रयागराजच्या
महाकुंभमेळ्यात ‘गंगा-यमुना-सरस्वती’च्या त्रिवेणी संगमावर
अमृत स्नान करून हे श्री.स्वामी समर्था, हे गंगा मैय्या तुझ्या भक्तीचा वसंत साऱ्यांच्या हृदयात फुलू दे असे साकडे घालण्याकरिता आलो असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. आज वसंत पंचमीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून महाकुंभमेळ्यातील शेवटचा शाही अमृत स्नानसोहळा उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथील ‘गंगा यमुना सरस्वती’ नद्यांच्या त्रिवेणी संगमावर ब्रह्म मुहूर्त योग साधून लाखो साधुसंतांच्या दिव्य सानिध्यात व करोडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्ती भावात पार पडला. या मंगलमय सोहळ्यात महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्र परिवारांच्या सदस्यांनी व महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांनी
हरिद्वार येथील श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे स्वरयोग पीठाधिश्वर श्री.श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी चरणश्रित गिरी महाराज व आत्मवंदना जी गिरी यांच्या दिव्य सान्निध्यात
महेश इंगळे प्रथमेश इंगळे व प्रथमेश महेश इंगळे मित्रपरिवार सदस्यांनी जवळपास ५८ किलोमीटर पायी वारी करून करोडो भाविकांच्या उपस्थितीत व लाखो साधुसतांच्या दिव्य सानिध्यात वसंत पंचमीच्या ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ६ वाजता त्रिवेणी संगमावर अमृत योग शाही स्नान केले. यावेळी उत्तर प्रदेश प्रशासनाच्या वतीने शाही अमृत स्नान प्रसंगी संगमावर हेलीकॉफ्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. तत्पूर्वी स्वरयोग पीठाधिश्वर चरणश्रित गिरी महाराज यांच्या आशीर्वचन व अधिपत्याखाली महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्रपरिवारचे सदस्य मित्र परिवारपैकी संतोष पराणे, अंकूश केत, श्रीकांत झिपरे, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, सुरेश वाले, श्रीशैल गवंडी, संजय पवार, मनोज इंगुले, सागर गोंडाळ, दर्शन घाटगे, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे, धनराज स्वामी, स्वामीनाथ मुसळे आदी मित्र परिवार सदस्य यांनी गिरी महाराजांच्या आखाडा नियोजनानुसार विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊन भावभक्तीचे दर्शन घडविले. याप्रसंगी महेश इंगळे यांनी स्वामी चरणश्रित गिरी महाराजांचा व साध्वी साधकांचा स्वामीचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सन्मान केला. यावेळी स्वामी चरणश्रित गिरी महाराजांनी देखील महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व मित्रपरिवार यांचाही रुद्राक्ष, प्रसाद, देवून सत्क्रार केला. यानंतर महेश इंगळे प्रथमेश इंगळे मित्र परिवार यांनी स्वरयोग पीठाधिश्वर चरणश्रित गिरी महाराज यांच्या महाकुंभमेळ्यातील विवीध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी या ठिकाणी गिरी महाराजांच्या आखाड्यात लंगर भोजन प्रसाद व गिरी महाराजांच्या आशिर्वदाचा लाभ सर्वांनी घेतला.महेश इंगळे मित्र परिवारच्या या प्रयागराज भेटीदरम्यान प्रयागराज दौरा सुलभ होणेकामी इंडीयन आर्मी प्रयागराज रेजिमेंट कॅम्पचे सुभेदार मेजर भुपेंद्र शर्मा, सुभेदार मेजर भुपेंद्र कुमार, सुभेदार मेजर रामकुमार, हवालदार जयंता देवरी, अक्कलकोट तालुक्याचे रहिवासी हवालदार अमोल माने यांच्यावतीने महेश इंगळे मित्र परिवारच्या निवासाची व भोजन प्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे सर्व सदस्यांनी आर्मी कॅम्पबद्दल गौरवोद्गार काढल्याप्रित्यर्थ महेश इंगळे यांनी सुभेदार मेजर भुपेंद्र शर्मा, सुभेदार मेजर भुपेंद्र कुमार, सुभेदार मेजर रामकुमार, हवालदार जयंता देवरी, अक्कलकोट तालुक्याचे रहिवासी हवालदार अमोल माने यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सत्कार करून आभार मानले.

फोटो ओळ – प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात अमृत योग अमृत स्नान करताना स्वरयोग पीठाधिश्वर चरणश्रित गिरी महाराज, महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व मित्र परिवार सदस्य दिसत आहेत.