मेजर अमोल माने यांचा स्विमींग ग्रुप व महेश इंगळे मित्र परिवारच्या वतीने सन्मान ; परराज्यात केलेले सहकार्य म्हणजे मेजर मानेंचे कौतुकास्पद कार्य – प्रथमेश इंगळे
महाकुंभमेळ्यास प्रयागराज येथील महेश इंगळे मित्रपरिवारास केलेले अखंड सहकार्य व महाकुंभमेळा शाही स्नान नियोजनाबद्दल झाला मेजर माने यांचा सन्मान.

अक्कलकोट (प्रतिनिधी ): माणुसकी जपण्याचे व माणुसकीच्या सामर्थ्यशाली शक्तीचे दर्शन घडविण्याची धमक ही इंडीयन आर्मीत ठासून भरलेली आहे. याची प्रचिती आम्हाला महाकुंभमेळयात प्रयागराज येथे आली आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभमेळ्यातील एकमेव शाही अमृत स्नान दौऱ्या करीता महाकुंभमेळ्यात आम्हाला इंडीयन आर्मीचे मेजर माने यांनी संपूर्ण दोन दिवस वेळ देवून प्रयागराज रेजिमेंटच्या इंडीयन आर्मी कॅम्पमध्येच आमची राहण्याची, भोजनाची उत्तम व्यवस्था केली.

या नंतर जवळपास २ कोटी भाविकांच्या गर्दीत शाही स्नानास त्रिवेणी संगमावर जाण्याकरीता विशेष नियोजन करुन महामंडलेश्वर चरणाश्रीत गिरी महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात कार्य सिद्धीस नेऊन महाराष्ट्रयीन संस्काराची संस्कृती जपली आहे. त्यांनी आपल्या कार्यातून परराज्यात केलेले सहकार्य म्हणजे मेजर माने यांचे कौतुकास्पद कार्य असल्याचे प्रतिपादन स्विमींग ग्रुपचे संस्थापक व श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे चिरंजीव तथा स्विमिंग ग्रुपचे सदस्य प्रथमेश इंगळे यांनी केले. आज मेजर माने यांनी अक्कलकोटला आल्यानंतर सर्वप्रथम श्री वटवृक्ष मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे सपत्निक दर्शन घेतले. यानंतर स्विमींग ग्रुप फार्म हाऊसला सदिच्छा भेट दिली.

यावेळी स्विमिंग ग्रुपच्या वतीने महेश इंगळे यांनी मेजर माने व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा श्री.स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, संपूर्ण वस्त्राण भेट देवून यथोचित सन्मान केला. या वेळी प्रथमेश इंगळे बोलत होते. या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी मेजर माने यांनी आम्हाला कृतज्ञता पूर्ण करण्याची संधी देऊन येथे उपस्थित राहून मान सन्मान स्वीकारल्याबद्दल मेजर माने यांचे आपण शतशः आभारी आहोत असे मनोगत व्यक्त केले. यावेळी स्विमिंग ग्रुपचे व महेश इंगळे मित्र परिवारचे सदस्य प्रथमेश इंगळे, संतोष पराणे, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, बाबा सुरवसे, ज्ञानेश्वर भोसले, अंकुश केत, चंद्रकांत सोनटक्के, सुरेश वाले, नंदकुमार जगदाळे, दर्शन घाटगे, तुषार मोरे, श्रीशैल गवंडी, संजय पवार, मनोज इंगुले, रमेश शिंदे सर, श्रीकांत मोरे, शशिकांत कडगंची, सागर गोंडाळ, समर्थ पराणे, बाबा सुरवसे, श्रीकांत झिपरे, मधुकर सदाफुले, धनराज स्वामी, सुरेश सुरवसे, इत्यादी उपस्थित होते.
