श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साजरा.
अक्कलकोट शहरातून निघाली श्री स्वामी समर्थांच्या पारंपारीक भव्य पालखी सोहळ्याची मिरवणूक.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250213-WA00771-780x470.jpg)
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साजरा.
अक्कलकोट शहरातून निघाली श्री स्वामी समर्थांच्या पारंपारीक भव्य पालखी सोहळ्याची मिरवणूक.
(श्रीशैल गवंडी, दि.१३/०२/२०२५)
अक्कलकोट…. …… आज गुरूप्रतिपदेरोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती संपन्न झाली. यानंतर स्वामी भक्तांचे वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक झाले. सकाळी ८:३० वाजता चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत पुरोहीत मंदार महाराज व ब्रम्हवृंदांच्या वैदिक मंत्रोच्चारात
देवस्थानचे विश्वस्त महेश गोगी यांच्या हस्ते पारंपरिक देवस्थानचे लघुरुद्र करण्यात आले. दुपारी ११:३० वाजता श्रींना नैवेद्य आरतीद्वारे महानैवेद्य अर्पण करून भक्त निवास येथे स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आले. याचा लाभ हजारो स्वामी भक्तांनी घेतला. दिवसभर हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकारिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व सेवेकरी प्रयत्नशील होते. सायंकाळी ५ वाजता श्रींच्या सजविलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात देवस्थानचे पुजारी मोहन महाराज, मंदार महाराज, व्यंकटेश महाराज यांचे हस्ते आरती करून व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांचे हस्ते पालखी पूजन करून वारकरी दिंडया व बँड पथक व स्वामी नामाच्या जयघोषात पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले. पालखी मिरवणुक फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ, परतीचा मार्ग कारंजा चौक, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, मधला मारुती, भारत गल्ली, देशमुख गल्ली, मार्गे वटवृक्ष मंदिरात रात्री साडे नऊ वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर गुरु भजन व आरती होवून उपस्थित सर्व भाविकांना मंदिर समितीच्या वतीने शिरा प्रसाद वाटप करण्यात आले. यानंतर गुरूप्रतिपदा उत्सव कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मंदार महाराज पुजारी, महेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, चंदकांत गवंडी, शशिकांत लिंबीतोटे, प्रदिप हिंडोळे, महादेव तेली,
अमर पाटील, प्रसन्न हत्ते, रामचंद्र समाणे, संतोष पराणे, श्रीकांत झिपरे, सागर गोंडाळ, गिरीश पवार, प्रसाद सोनार, महेश काटकर, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, ऋषिकेश लोणारी, अविनाश क्षीरसागर, संतोष जमगे, लखन सुरवसे, संजय बडवे, मोहन शिंदे, वैभव जाधव, नरसिंग क्षीरसागर, दादा सावंत, दिपक जरिपटके, ज्योती जरिपटके, प्रसाद पाटील सर, विपूल जाधव, नागनाथ जेऊरे, राजेश निलवाणी, चंद्रकांत डांगे, पोपट भोसले, दिगंबर पाटील, श्रीमंत पांचाळ, अक्षय पांचाळ, नागनाथ गोमदे, आदींसह देवस्थानचे सेवेकरी व अनेक स्वामीभक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
फोटो ओळ – पालखी मिरवणूक शुभारंभ प्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदार महाराज व इतर दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)