वागदरीच्या श्री परमेश्वर यात्रेस गुडीपाडवापासून प्रारंभ…
4 एप्रिल रोजी दोन सत्रात सकाळी लहान कुस्त्या दुपारी ४ वाजता मोठ्या मल्लांच्या कुस्त्या पार पडणार आहेत.

वागदरीच्या श्री परमेश्वर यात्रेस गुडीपाडवापासून प्रारंभ…

अक्कलकोट, (प्रतिनिधी) सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रेस ३० मार्च पासून प्रारंभ होत आहे.यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ही यात्रा भरत असते नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असे ठिकाणी आहे. वागदरी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवर वरती आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे हजारो भाविक या यात्रेत सामील होतात हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे यावर्षी ही यात्रा रविवारी गुडीपाडवापासून सुरु होत असे यात्रा कमिटीचे सिध्दाराम बटगेरी व नागप्पा घोळसगांव यांनी सांगितले. गुढी पाडव्या दिवशी पहाटे भक्ताकडून दंड नमस्कार, श्री च्या मूर्तीस रुद्रभिषेक, लहान रथ (उचई) सुवर्ण कळसारोहण, सायंकाळी रथास जागा सोडविण्याचा कार्यक्रम, पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत. ४ एप्रिल रोजी दोड्डुमदलसी अर्थात रात्री गूळ साखर वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
3 एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे दुपारी २ वाजता रथास सुवर्ण कळसारोहण, सायंकाळी रथोत्सव, रात्री गोंधळी पौराणिक नाटक व कन्नड सामाजिक नाटक सादर होणार आहे. 4 एप्रिल रोजी दोन सत्रात सकाळी लहान कुस्त्या दुपारी ४ वाजता मोठ्या मल्लांच्या कुस्त्या पार पडणार आहेत. त्याच दिवशी रात्री ८ वाजता शोभेच्या दारुकामाने यात्रेची सांगता होईल, असे याञा कमिटी व परमेश्वर देवस्थान समितीने कळविले आहे याचा भक्तांनी लाभघ्यावा तसेच यावेळी महाप्रसादाचे चे व्यवस्था करण्यात आली आहे याचा भक्तानी लाभ घ्यावा.
श्री परमेश्वर देवस्थान कडून भव्य महाव्दार गोपूरम बांधकामाचे काम हाती घेण्यात आली असून अर्ध पेक्षा जास्त काम झालं असून अजून कामा साठी आर्थिक मदत देणगी देण्याचे आवाहन परमेश्वर देवस्थान पंच कमिटीने केले आहे.
