गावगाथा

जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा सदगुरु श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वीरशैव लिंगायत समाजाचे राज्यस्तरीय दुसरे वधुवर परिचय मेळावा अक्कलकोट येथे मोठ्या उत्साहात पार पाडला.

अक्कलकोट दि.१८ (प्रतिनिधी)
जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा सदगुरु श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वीरशैव लिंगायत समाजाचे राज्यस्तरीय दुसरे वधुवर परिचय मेळावा अक्कलकोट येथे मोठ्या उत्साहात पार पाडला.
रविवार दि. २० नोव्हेंबर २२ रोजी सकाळी १० ते ०४ या वेळेत शरण मठ वागदरी रोड अक्कलकोट जि. सोलापूर येथे सदगुरु चिक्करेवणसिध्द शिवशरण महास्वामी अक्कलकोट यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला यास चांगला प्रतिसाद मिळाला. सदर मेळाव्यास राज इलेक्ट्रिक डिस्ट्युबिटर्सचे मालक विकास जकापुरे अक्कलकोट यांनी पुर्ण त्या दिवसाचे नाष्टा चहा व जेवणाचे व्यवस्था केलेले होते.
या मेळाव्यास प्रत्यक्ष, ऑनलाईन व्दारा ७००पेक्षा जास्त वधुवराची नोंदणी झाली असून सदर मेळाव्यास वधुवर व पालकासह ३००० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होते. वीरशैव लिंगायत मोफत वधुवर सुचक सोलापूर जिल्हा प्रमुख ईराणा पनशेट्टी तडवळ ता.अक्कलकोट शिवसांब कोरे सर नांदेड,प्रा.माधव लाईदवार,मल्लीनाथ याळगी सोलापुर,तानवडे अकलुज, गुरुनाथ नरुणे अक्कलकोट,रवि कोरे पुणे, कार्तिक स्वामी इंडी, दिपक उठगे,सौ.पुष्पा करंजे, शिवशंकर स्वामी सर सौ. वर्षा देशमुख, सुरेश चाकोते डॉ. अंतेश्वर नरवणे, अनिल चलवदे सर, मन्मथ मिरजगांवे, गौरीशंकर नरुणे,अरविंद लोणी, बसवराज हिरेमठ यांनी आयोजित केला होता. महाराष्ट्र राज्यातील लिंगायत समाजातील सर्व जाती पोटजातीचा समावेश या मेळाव्यात होता. यात डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, शासकीय कर्मचारी, खाजगी नोकरदार, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, शिक्षित अशिक्षित वं सामान्य असे सर्व वधुवर मोठ्या संख्येने उपस्थित होती.
यावेळी सिध्देश्वर कल्लुरकर सोलापुर व विश्वनाथ शेगावकर सावकर सोलापुर व मलगोडा सर अक्कलकोट, राजशेखर लोखंडे अक्कलकोट तलाटी युनियनचे अध्यक्ष, मल्लिनाथ कापसे सर जेऊर, उमाकांत शटगार हिळ्ळी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.यावेळी तडवळचे निंगप्पा केमशेट्टी सावकार, मल्लिकार्जुन तळवार सर, हुगार सर, बसवराज बिराजदार पत्रकार, चौधरी सर पत्रकार,रमेश शिंदे, वसंत भिसे, बरुरे, मल्लु पनशेट्टी सरपंच, कामा बडूरे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button