थंडीत गव्हाच्या पीठाचे हे पौष्टिक लाडू जरुर खा, सर्व आजारांमधून होईल सुटका.!
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/11/Wheat-Flour-Ladoo.jpg)
थंडीत गव्हाच्या पीठाचे हे पौष्टिक लाडू जरुर खा, सर्व आजारांमधून होईल सुटका.!
गव्हाच्या पीठाचे खायला खूपच चविष्ट लागतात. हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. कारण यामध्ये अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट्स, मखाने, डिंक असते. त्यामुळे हे लाडू तुम्ही घरी जरुर तयार करुन पाहा…
हिवाळ्याला (Winter) सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात असणाऱ्या थंडीमुळे बऱ्याच शारीरिक व्याधी होतात. पन्नाशीनंतर सांधेदुखी, कंबर दुखीचा त्रास होते. यावर रामबाण उपाय म्हणून थंडीमध्ये बऱ्याच प्रकारचे पौष्टीक लाडू तयार करुन खाल्ले जातात. या लाडूंमुळे हिवाळ्यात होणाऱ्या आरोग्याशी संबंधित त्रास दूर होतात. हिवाळ्यात अनेकांच्या घरी गव्हाच्या पीठाचे पौष्टीक लाडू (Wheat Flour Ladoo) तयार केले जातात. यामध्ये बऱ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट्स टाकले जातात. हे लाडू खाणे खूपच फायदेशीर असते. तर आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पीठाचे पौष्टिक लाडू (Wheat Flour Ladoo Recipe) कशा पद्धतीने तयार करायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत….
गव्हाच्या पीठीचे पौष्टिक लाडू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –
– गव्हाचे पीठ 3 कप
– तूप 2 कप
गुळ 300 ग्रॅम
खारीक 10/12
खोबर 2 कप
डिंक 10 ग्रॅम
– मखाणे 1 कप
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
– काजू 10 ते12
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
– बदाम 10 ते12
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
– अक्रोड 10 ते 12
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
– जायफळ पावडर 1 चमचा
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
– वेलची पावडर 1 चमचा
असे तयार करा गव्हाचे पौष्टिक लाडू –
लाडू तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक वाटी साजूक तूप टाकून ते गरम करुन घ्या. या तूपामध्ये आता तीन कप गव्हाचे पीठ (चाळून घ्या) टाकून ते भाजून घ्यायचे आहे. गव्हाचे पीठ भाजत असताना ते सुरुवातीला मध्यम आचेवर भाजून घ्या. पीठाचा रंग बदलल्यानंतर गॅस मंद आचेवर करुन पीठ भाजून घ्यायचे आहे. पीठामध्ये तुम्ही गरज लागली तर चमच्याच्या सहाय्याने तीन ते चार चमचे तूप टाकून भाजू शकता. जवळपास अर्धा तास हे पीठ भाजण्यासाठी लागेल. आता तूपामध्ये भिजत ठेवलेली मेथी दाण्याची पावडर एक चमचा टाकून ती मिक्स करुन घ्या. तुम्हाला मेथी नको असेल तर नाही टाकली तरी चालेल. अशाप्रकारे आपले गव्हाचे पीठ खरपूस भाजून होईल.
आता कढईमध्ये अर्धा कप तूप टाकून त्यामध्ये डिंक टाकून ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. डिंक एका ताटामध्ये काढून घ्या. आता मंद आचेवर तूपामध्ये बदाम, काजू, अक्रोड, खारीक हे ड्रायफ्रूट्स एक एक टाकून भाजून घ्यायचे आहे. आता किसलेले खोबरे कढईमध्ये खरपूस भाजून घ्या. त्यानंतर कढईमध्ये मखाने तीन ते चार मिनिटं गरम करुन घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेले सर्व पदार्थ एक-एक टाकून जाडसर पावडर तयार करुन घ्या. आता कढईमध्ये थोडेसे तूप टाकून 300 ग्रॅम गूळ वितळवून घ्यायचा आहे. या गुळामध्ये एक चमचा जायफळ किंवा वेलची पावडर टाकून मिक्स करा. आता पीठामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स पावडर, मखान्याची पावडर, गरम करुन घेतलेला गूळ टाकून सर्व मिश्रण मिक्स करुन घ्या. आता या मिश्रणाचे छोट्या आकाराचे लाडू तयार करुन घ्या. अशा प्रकारे आपले गव्हाच्या पीठाचे पौष्टीक लाडू तयार होतील.