
*श्री रामलिंगेश्वर शिक्षण संकुलात मौलाना आझाद यांना अभिवादन*
श्रीक्षेत्र तीर्थ – (ता. द. सोलापूर )22 फेब्रुवारी 2025
एक प्रसिद्ध मुस्लिम विद्वान, कवी, लेखक, पत्रकार , स्वातंत्र्य सेनानी. भारतरत्न मौलना आझाद यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुधीर सोनकवडे होते. यावेळी श्री सचिन गुजा यांनी मौलाना आझाद यांच्या सामाजिक, राजकीय, कारकीर्द विशद करून स्वतंत्र्यानंतर गांधींच्या विचारधारेने प्रभावित झालेले व गांधीजींचे विचारसरणीने राजकारण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मौलाना आझाद. तर स्वतंत्र्याच्या कालखंडानंतर भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी अतिशय उत्तमरित्या काम केल्याचे इतिहास साक्ष असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोप करताना सोनकवडे म्हणाले की, आझाद यांचे जीवन प्रवास अतिशय उत्कृष्ट उपलब्धतेने भरलेले होते.उर्दू भाषेतील ते एक सर्वोत्तम विद्वान होत. त्याचबरोबर त्यांची प्रसिद्धी मागचे एक वेगळ कारण होतं ते म्हणजे विश्वदृष्टी व मानवतावाद दृष्टिकोन या बद्दल एक विचारक म्हणून त्यांचे योगदान होते.तसेच धर्मनिरपेक्ष व लोकतांत्रिक प्रक्रियेवर दृढ निष्ठेने काम करणे ही त्यांची ख्याती होती. असे प्रतिपादन केले. यावेळी सौ शिल्पा महिंद्रकर, सिद्धेश्वर बिराजदार, सिद्धाराम पाटील, गुरुशांत बिराजदार, राजकुमार देडे, बाबूलाल धोडमिशे, सिद्धेश्वर घोंगडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश पट्टणशेट्टी यांनी केले.
