स्वामीकृपेसह महेश इंगळेंचे आरोग्य सेवेतही मौलिक योगदान – गुणवंत साळुंखे
चिकहळ्ळीत श्री.स्वामी समर्थ रुग्णालय व शिवराजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर व औषधे पुरवठा

स्वामीकृपेसह महेश इंगळेंचे आरोग्य सेवेतही मौलिक योगदान – गुणवंत साळुंखे

चिकहळ्ळीत श्री.स्वामी समर्थ रुग्णालय व शिवराजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर व औषधे पुरवठा

शिवजयंती निमीत्त आयोजित मोफत शिबीराचा ग्रामीण भागातील १६८ रुग्णांनी घेतला लाभ.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.२२/०२/२०२५)
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचा तालुक्यातील धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय उपक्रमांत नेहमीच मोलाचा वाटा असतो. मंदीर धार्मिक सेवेसोबत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील श्री.स्वामी समर्थ रुग्णालयातही महेश इंगळे यांनी आजपर्यंत अनेक आरोग्य शिबीरांचे यशस्वी आयोजन केले आहे. यानिमीत्ताने स्वामीकृपेसह महेश इंगळेंचे आरोग्य सेवेतही मौलिक योगदान असल्याचे प्रतिपादन चिकहळ्ळी येथील
शिवराजे प्रतिष्ठानचे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गुणवंत साळुंखे यांनी केले. आज शिवजयंती उत्सवानिमीत्त चिकहळ्ळी येथे श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्री.स्वामी समर्थ रुग्णालय व शिवराजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष गुणवंत साळुंखे बोलत होते. या आरोग्य शिबीरात
चिकहळ्ळी व परिसरातील जवळपास १६८
गरीब व गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. यामध्ये रुग्णांची रक्त शर्करा (ब्लड शुगर) थायरॉईड, हिमोग्लोबीन आदींसह विविध आजारांवर चाचण्या करून रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. या वैद्यकीय सेवेत डॉ.प्रमोद सुतार, डॉ.हिप्परगी, डॉ.सचिन व वैद्यकीय स्टाफ यांनी मोफत सेवा दिली. प्रारंभी शिवजयंती उत्सवानिमीत्त महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.प्रमोद सुतार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती संपन्न झाली. या आरतीस व आरोग्य शिबीरास शिवराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळुंखे, उत्सव समिती अध्यक्ष गुणवंत साळुंखे, उपाध्यक्ष लक्ष्मीपुत्र जोगदे, नितिन साळुंखे, सुधीर मचाले, राजशेखर म्हेत्रे, शिवमुर्ती म्हैसलगी, चंदप्पा देगील, सिद्धप्पा हडपद आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – आरोग्य शिबीरात रुग्णांची तपासणी करताना वैद्यकीय पथक, छत्रपती शिवरायांच्या आरती प्रसंगी डॉ.प्रमोद सुतार व अन्य दिसत आहेत.
