श्री शंकरलिंग प्रशालेत “”सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा”” सेमीनार संपन्न
वळसंग ===पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शंकरलिंग माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमामध्ये विद्यापीठातील संगणक शास्त्र संकुलातील गौरी पाटील सोनल तोडकरी व संजना खैराटे या विद्यार्थिनींनी सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या विषयावर सेमिनार दिला या सेमिनार मध्ये त्यांनी आजच्या ऑनलाईन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल सर्वांना काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली OTP कोणाला सांगू नये अनोळखी नंबर वरून आलेला फोन कॉल ती पडताळणी करून घेणे तसेच व्हाट्सअप व इतर सोशल मीडियावरून आलेला मेसेज व लिंक ची शहानिशा करा व तसेच हॅकिंग ऑनलाइन स्कॅम डिजिटल अरेस्ट अशा विविध स्कॅमला कसे ओळखावे याचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. स्ट्रॉंग पासवर्ड कसा बनवावा आणि आपले सॉफ्टवेअर कसे सुरक्षित ठेवावे याचीही माहिती दिली मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप इत्यादी साधनांवर अधिकृत अँटिव्हायरसचा वापर करावा हे सांगितले त्या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री वीरेश थळंगे पर्यवेक्षक श्री शिवानंद घोडके सिद्धारूढ हिरेमठ उपस्थित होते
Back to top button
×
No WhatsApp Number Found!