Solapur: जेष्ठ शिक्षक काशिनाथ मणुरे यांचा प्रामाणिकपणा ; सापडलेले साडेतीन तोळ्याचे गंठण केले परत

सोलापूर (प्रतिनिधी): के.एल.ई. सोसायटी संचलित सिल्व्हर ज्यूबिली हायस्कूल, बार्शी येथे कार्यरत असणारे जेष्ठ शिक्षक काशिनाथ मणुरे हे काल रविवारी सुट्टी निमित्त जेऊर येथे गावाकडे गेले होते, शेतावरून परतत असताना त्यांना रस्त्यामध्ये निर्मनुष्य ठिकाणी पर्स पडल्याचे निदर्शनास आले, सदर पर्स उघडले असता त्यामध्ये साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण अंदाजे किंमत 3 लाख रुपयाचे होते. आत मध्ये एका चिठ्ठीवर फोन नंबर होता त्या फोन नंबर वर कॉल केला असता प्रशांत आवटे हद्राळ (ता. अक्कलकोट) यांच्या सध्या पुणे येथे राहणाऱ्या बहिणीचे असल्याचे समजले. आपले हरवलेले वस्तू योग्य व्यक्तीला माणुसकी जपणाऱ्या व पेशाने शिक्षक असलेल्या काशिनाथ मणुरे यांना सापडल्याने हरवलेली वस्तू आपल्याला प्रामाणिकपणे मिळाल्याची भावना व्यक्त केली.

काशिनाथ मणुरे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.. हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, उपमुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी, पर्यवेक्षिका अनुराधा विश्वेकर व सर्व स्टाफनी त्यांच्या या कृतीबद्दल कौतुक केले.
