Akkalkot: आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतली वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन

अक्कलकोट (प्रतिनिधी): येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे, त्यामुळे स्वामीभक्त हे स्वामींच्या या मूळस्थानी आवर्जून येत असतात व अत्यंत भक्ती भावाने स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत असतात. ही बाब लक्षात घेऊनच मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली भाविकांच्या भक्तीला दाद देत वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाचे उत्तम नियोजन असल्याचे मनोगत नवी मुंबई येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले.

ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार मंदा म्हात्रे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी आमदार म्हात्रे बोलत होत्या. पुढे बोलताना आ.म्हात्रे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे कार्य हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने चालत असल्याचे पाहून समाधान वाटले आहे. मंदिर समितीच्या या कार्यास आपली नेहमीच साथ असून आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण तत्पर असल्याचे मनोगत ही व्यक्त केले. याप्रसंगी अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रथमेश इंगळे,

ननू कोरबू, नागराज कुंभार, बाळा शिंदे, कांतू धनशेट्टी, प्रविण देशमुख, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, श्रीकांत मलवे आदींसह भारतीय जनता पार्टीचे अन्य कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होते.
