स्वामींचे वरदहस्त आपल्या जीवनावर असल्याने जीवन सदैव सुखी समाधानी — कवी अशोक नायगावकर
कवी अशोक नायगावकर व कुटुंबीयांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे अभियंता वरूणराजे शेळके व अन्य दिसत आहेत.

स्वामींचे वरदहस्त आपल्या जीवनावर असल्याने जीवन सदैव सुखी समाधानी — कवी अशोक नायगावकर यांचे मनोगत.

(श्रीशैल गवंडी, )-अ.कोट
जे स्वामींकडे समर्पणाच्या भावनेने जातात,
स्वामी त्यांना आत्म्याच्या साराने शिकवतात.
ध्यानात मग्न राहिल्याने अनंत आनंद मिळतो,
स्वामींच्या ज्ञानाने हृदयातील प्रत्येक दुःख दूर होते.
मन शांत ठेवणे हा ध्यानाचा मार्ग आहे.
मीही एक निस्सीम स्वामीभक्त असल्याने मनशांती व स्वामीनामाच्या ध्यानातून तसेच स्वामीनामाच्या पूजनातून आपल्याला जीवनाचा अर्थ शुद्ध मिळालेला आहे म्हणून कवी अशोक नायगावकर म्हणून आपल्यासमोर नावारूपाला आलेला आहे. स्वामींची पूजा केल्याने आपल्याला जीवनाचा शुद्ध अर्थ मिळतो. या मध्यमातून जीवन सुखी होते त्यामुळे आपल्या जीवनावरही स्वामींचे वरदहस्त असल्याने जीवन सदैव सुखी समाधानी असल्याचे मनोगत आपल्या विशेष काव्यशैलीमुळे सुप्रसिद्ध असलेले हास्य कवी अशोक नायगांवकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कवी अशोक नायगावकर व कुटुंबीयांचे स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी कवी अशोक नायगावकर बोलत होते. यावेळी त्यांनी दर्शनाकरिता पुन्हा अक्कलकोटला येण्याचे कारण खालील प्रमाणे एक अत्यंत अप्रतिम काव्यरचनेतून सादर केले आहे ते पुढील प्रमाणे. झालो दंग मी भजनात, विसरुनीया सारं स्वामी नामात, न लागे मज कधी कष्ट, असे मजवरी स्वामींचा वरदहस्त,
राहिन क सा मी दुःखी, असता स्वामी नाम मुखी, खंड न पडो कधी स्वामी देवा, होऊदे सदैव मज हातूनी तुझी सेवा, लागली मज ओढ स्वामी दर्शनाची, बोलावूनी घेशील कधी तुझ्या चरणांपाशी, मन झाले आतूर तुझ्या भेटीसाठी, जीव अडकला माझा अक्कलकोटी या काव्यरचनेतून आपणास स्वामी दर्शनाकरिता जीव अडकले असल्याचे सांगून या निमित्ताने आज सहकुटुंब अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांच्या चरणी आपण नतमस्तक झालो असल्याचे मनोगतही कवी अशोक नायगावकर यांनी व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, बांधकाम अभियंता वरूणराजे शेळके,
श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, प्रसाद पवार, शिवशरण अचलेर, स्वामीनाथ लोणारी, आदिसह भाविक भक्त व नायगावकर कुटुंबीय उपस्थित होते.

फोटो ओळ – कवी अशोक नायगावकर व कुटुंबीयांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे अभियंता वरूणराजे शेळके व अन्य दिसत आहेत.
