
गरजू विद्यार्थ्यांना किराणा वाटप

गोरेगाव पूर्व फिल्मसिटी नागरमोडी पाड्यातील आंबेवाडी वस्तीत दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आग लागून अनेक झोपड्या जळाल्या असून येथील जवळपास सर्वांचेच संसार उध्वस्त झाले आहेत.आजमितीला त्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही.या पाड्यात राहणारे जवळपास ३० विद्यार्थी फिल्मसिटी जवळच डोअर स्टेप स्कूल च्या बसमध्ये भरणाऱ्या शाळेत शिकत असून त्यांनी त्यांच्या शिक्षिका लता ब्रीद यांच्याकडे काही जीवनावश्यक गोष्टींची मागणी केली असता ब्रीद मॅडम यांनी जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली.हिरवे सरांनी लागलीच याकामी पुढाकार घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांशी बोलून स्वतः येथील मुलांना किराणा सामान वितरीत केले.यासाठी विजय फणसेकर, सूर्यकांत सालम, प्रभा सोलंकी, ऋता रानडे, वैशाली बागडे, सुशील नागवेकर, कविता सांगळे, अजित वैद्य आदींनी पदरमोड करून मोलाचे सहकार्य केले.आज किराणा मिळाल्याने हे विद्यार्थी आनंदित झाले असून त्यांनी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
