धर्माचरणातून भक्तीमार्ग दाखविणारे केंद्रबिंदू म्हणजे वटवृक्ष मंदिर – शिक्षण अधिकारी सचिन जगताप
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांचे मनोगत
(Shrishail Gavandi.अ.कोट. दि.१०/०८/२०२५) – आजच्या आधुनिक युगात भौतिक सुखाच्या शोधात मानसिक शांतीपासून परावृत्त होत असलेल्या मानवी जीवनास आध्यत्मिकतेतून व धर्माचरणातून भक्तीमार्ग दाखविणारे केंद्रबिंदू म्हणजे स्वामी समर्थांच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेले येथील वटवृक्ष मंदिर असून स्वामींचे हे वटवृक्ष मंदिर हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असल्याचे मनोगत सोलापूरचे माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी व्यक्त केले. ते नुकतेच श्री वटवृक्ष मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन व आशिर्वाद घेतले असता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी शिक्षण अधिकारी सचिन जगताप व कुटूंबियांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना
शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी मंदिर समितीच्या वतीने राबविण्यात येणारे विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रम हे भाविकांना प्रेरणादायी, व मार्गदर्शनपर आहेत. येथे येणाऱ्या भाविकांकरीता हे स्तुत्य कार्य असल्याचे प्रतिपादनही यावेळी केले. यावेळी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जाधव फुटाणे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, गिरीश पवार, प्रसाद सोनार, बाळासाहेब एकबोटे, संतोष पराणे, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – शिक्षण अधिकारी सचिन जगताप व कुटूंबियांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सन्मान करताना महेश इंगळे, संतोष जाधव-फुटाणे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!