गावगाथा

पंचवीस वर्षानंतर भेटले माजी विद्यार्थी ; एकमेकांना भेटल्यानंतर काहीना अश्रू अनावर

माजी विद्यार्थी मेळावा

पंचवीस वर्षानंतर भेटले माजी विद्यार्थी ; एकमेकांना भेटल्यानंतर काहीना अश्रू अनावर

दुधनी: तब्बल पंचवीस वर्षापूर्वी एकत्र शिकलेले दुधनी येथील श्री. संगण्णप्पा गोविंदप्पा परमशेट्टी हायस्कूलच्या सन १९९९-२००० दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अक्कलकोट येथील हॉटेल फोर पेटल्स येथे थाटामाटात पार पडला. राष्ट्रगीत घेवून या स्नेह मेळाव्याला सुरूवात करण्यात आली.

शाळेचे माजी मुख्याध्यापीका गुरुदेवी हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली आणि शाळेचे निवृत्त शिक्षक एस.एस. तोदलबागी, आर. एस. हिटनळळी यांच्या प्रमुख उपस्थीतीत स्नेह मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुरुवात शारदा मातेचे प्रतिमा पुजन आणि दिप प्रज्वलन करून करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी गुरुशांत माशाळ यांनी केले. सद्या आपण कोण? या मथळ्याखाली सर्व माजी विद्यार्थी आपली ओळख करून देताना शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थींनीना गुलाब पुष्प देवून फेटा बांधून स्वागत करण्यात आले तर माजी शिक्षकांना फेटा बांधून स्वामी समर्थ महाराज यांचे प्रतिमा देवून गौरविण्यात आले.

सध्या या बॅचचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. बीएसएफ, शिक्षण, आरोग्य, अभियंता, भारतीय रेल्वे अशा विविध क्षेत्रात आपले ठसा उमटविला आहेत. पंचवीस वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाहून एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमासाठी महेश चिंचोळी, सदानंद खैराट, अविनाश बंद्राड, यांनी परिश्रम घेतले.

यावेळी काशिनाथ म्हेत्रे, दत्ता जमादार, इरप्पा नंदुरे, शिला सुतार, श्रीदेवी सोळसे, गुरूदेवी परमशेट्टी, ज्योती परमशेट्टी, राजश्री धोडमनी, महादेवी कोटनुर, सुरेखा गुड्डोडगी, महानंदा गुड्डोडगी, श्रीदेवी गुड्डोडगी, सविता निंबाळ, सविता हावशेट्टी, बिरप्पा गवंडी, शंकर रूगी, संजय क्यार, सिद्दाराम बिराजदार, मल्लिनाथ घुळनुर, शरण कलशेट्टी यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरविंद खैराट व राधिका पाटील यांनी केले. आभार बसवराज जमादार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button