कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.;श्री स्वामी समर्थ मालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या स्वामी २ या दुसऱ्या गाण्याचे गाणे लॉन्च
(श्रीशैल गवंडी, दि.१०/०८/२०२५.अ.कोट)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या या १७ व्या वर्धापन दिनानिमीत्त देवस्थानचे व महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे यांच्या शुभहस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर येथील पसायदान हॉटेलचे मालक व उद्योजक
राम लहाने, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, युवा नेते प्रथमेश महेश इंगळे, ज्योतीताई लहाने, कविता मिठे, फौंडर्स लवचे चेअरमन डॉ.प्रशांत गवळी, प्राचार्य नागनाथ जेऊरे सर सर्व टिचिंग व नॉन टिचिंग स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ मालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या स्वामी २ या दुसऱ्या गाण्याचे गाणे लॉन्च करण्यात आले. याप्रसंगी बोलताना देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी कै.कल्याणराव इंगळे साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज पॉलिटेक्निक कॉलेज उभे आहे व त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व इंजिनीयर घडत आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे सांगून श्री स्वामी समर्थ मालिकेतील नवीन गाणे तयार केल्याबद्दल डॉ.प्रशांत गवळी यांचे आभार मानले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी चेअरमन साहेबांनी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सर्व स्टाफना व विद्यार्थ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी
वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात द्वितीय वर्ष संगणक विभागातील निकिता पुजारी हिने मनोगत व्यक्त केले. प्रथम वर्ष मेकॅनिकल विभागातील प्रथमेश हत्तुरे याने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित गाण्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्फिया काझी हिने केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक घुरघुरे सर यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!