श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिर संपन्न.
श्री.वटवृक्ष देवस्थान व डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत शिबीराचा ३२१ दिव्यांग रूग्णांनी घेतला लाभ.
रुग्णसेवा हीच स्वामी सेवा समजून देवस्थान कडून नेहमीच आरोग्य विषयक शिबिरे आयोजित केले जातील – प्रथमेश इंगळे
(दि.१०/०८/२०२५, अ.कोट)
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलीत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात २० वर्षांखालील दिव्यांग रुग्ण मुलांसाठी आयोजित करण्यात आलेले होमिओपॅथिक शिबिर आज सकाळी ०८ ते दुपारी ३ या वेळेत मोठ्या आस्थेने संपन्न झाले. या होप फॉर होपलेस मोफत होमिओपॅथिक शिबीराचे शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते डॉ.प्रफुल्ल विजयकर,
डॉ.अपर्णा सामल व वैद्यकीय पथकांच्या उपस्थितीत करण्यात आला. या होमिओपॅथिक शिबिरात डॉ.प्रफुल्ल विजयकर व वैद्यकीय पथकाच्या वतीने २० वर्षांखालील दिव्यांग मुलांची शारिरीक, मानसिक, बौद्धीक तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले. वीस वर्षाखालील ३२१ दिव्यांग मुलांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. या कामी डॉ.प्रफुल्ल विजयकर, डॉ.अपर्णा सामल,
डॉ.प्रदीप विजयकर, डॉ.तन्मय विजयकर, डॉ.निशांत गांधी, डॉ.विनय मिश्रा, डॉ.श्वेताली बाळेकर यांच्यासह वैद्यकीय सेवक पथक व देवस्थानचे सेवेकरी रवी मलवे, श्रीकांत मलवे, भीमा मिनगले आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी दिव्यांग मुलांसाठी देवस्थानच्या वतीने अशा प्रकारचे होमिओपॅथिक शिबिरे नेहमीच भरविले जातात. वेळोवेळी तालुक्यातील अनेक दिव्यांग मुलांनी या शिबिरांचा लाभ घेऊन दिव्यांगत्वावर मात केलेले आहे व नैसर्गिक जीवन जगत आहेत. त्यामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक उपक्रमासोबतच आरोग्य शिबिरे राबविण्याचे उपक्रमही वारंवार राबविले जातात, याचे कारण असे की रुग्णसेवा हीच स्वामी सेवा समजून या आरोग्य शिबिरांचे उपक्रम राबविले जात असल्याचे मनोगत प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून या आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सर्व डॉक्टर्स यांचा मंदिर समितीच्या वतीने प्रथमेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,
श्रीकांत मलवे, मनोज काटगांव, रवी मलवे, सुनील नायकोडी, श्रीशैल गवंडी, संजय पाठक, दर्शन घाटगे, आदीत्य गवंडी, धनराज स्वामी इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिराचे शुभारंभ करताना व मान्यवरांचा सत्कार करताना प्रथमेश इंगळे, डॉ.अपर्णा सामल, मनोज काटगाव व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!